IND vs SA 1st Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डीन एल्गारचा यजमान संघ सर्व विकेट घेत भारताची गाडी रोखण्याच्या प्रयत्नात असेल टीम इंडियाचे लक्ष्य मोठी धावसंख्या उभारण्याकडे असेल. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 2 Live Streaming: केएल राहुलचे (KL Rahul) शानदार शतक, मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) अर्धशतकाने रविवारी सुपरस्पोर्ट पार्क येथे बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व गाजवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल 122 आणि अजिंक्य रहाणे 40 धावांवर फलंदाजी करत असून भारताने 90 षटकांत 272/3 अशी धावसंख्या पहिल्या दिवसाशी दबदबा कायम ठेवला. तर यजमान दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) 17 षटकांत 45 धावा देत सर्व तीन विकेट घेतल्या. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डीन एल्गारचा यजमान संघ सर्व विकेट घेत भारताची गाडी रोखण्याच्या प्रयत्नात असेल टीम इंडियाचे (Team India) लक्ष्य मोठी धावसंख्या उभारण्याकडे असेल. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs SA 1st Test Day 1 Highlights: सेंच्युरियन कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांचा, KL Rahul चे दणदणीत शतक; दक्षिण आफ्रिकेचा विकेटसाठी संघर्ष)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 HD, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी HD, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी थेट प्रसारित करेल. आणि Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारत-दक्षिण बॉक्सिंग डे टेस्ट Playing XI

भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (पंत), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), विआन मुल्डर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.