IND vs SA 1st Test Day 3: रवींद्र जडेजा याची धमाकेदार खेळी; जावगल श्रीनाथ, इशांत शर्मा सह 'या' यादीत झाला समावेश

आफ्रिकेच्या पहिल्या डावादरम्यान रवींद्र जडेजा याचा एका एलिट यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जडेजाने 44 व्या सामन्यात 200 टेस्ट विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

रविंद्र जडेजा (फोटो सौजन्य-PTI)

दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करत टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीला आलेला रोहित शर्मा याने मयंक अग्रवाल याच्या साथीने रेकॉर्ड 317 धावांची भागीदारी केली. यानंतर संघाने दुसऱ्या दिवशी 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. आफ्रिकेच्या पहिल्या डावादरम्यान रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा एका एलिट यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जडेजाने 44 व्या सामन्यात 200  टेस्ट विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारताने दुसऱ्या दिवशी डाव घोषित केल्यावर आफ्रिकेच्या पहिल्या डावात जडेजाने डेन पायटेड (Dane Piedt) आणि डीन एल्गार (Dean Elgar) यांची विकेट घेत 200 टेस्ट विकेट्सचा टप्पा गाठला. 200 टेस्ट विकेट्स घेणारा जडेजा हा 10 वा भारतीय क्रिकेटपटू आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्याच्या नावावर 198 विकेट्स होते. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शेवटच्या सत्रात जडेजाने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेन पायड याला बाद करून 199 विकेटचा टप्पा गाठला. आणि शुक्रवारी शेवटच्या सत्रात त्याने मिडविकेटवर पुजाराच्या हाती एल्गारला झेलबाद केले आणि 200 कसोटी विकेट्स घेतले. जडेजाने दुसरे सर्वात वेगवान 200 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी रविचंद्रन अश्विनने सर्वात जलद 200 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 37 सामन्यात 200 विकेट्स पूर्ण केल्या तर पाकिस्तानचा यासिर शाह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. शाहने 33 सामन्यात 200 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकाई संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही आणि सुरुवातीलाच लागोपाठ 3 विकेट गमावले. रवींचंद्रन अश्विन याने 2 तर, रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेतली होती. दुसऱ्या दिवशी आफ्रिकी फलंदाजांनी सावध सुरुवात केली. पण, इशांत शर्मा याने संघाला चौथे यश मिळवून देत आफ्रिकाई उपकर्णधार टेंबा बावुमा याला 15 धावांवर माघारी धाडले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif