IND vs SA 1st Test Day 3: फाफ डु प्लेसिस, डीन एल्गार यांनी सावरला आफ्रिकेचा डाव; तिसऱ्या दिवशी Lunch पर्यंत भारताला 349 धावांची आघाडी
पण, इशांत शर्मा याने बावुमाला 18 धावांवर बाद केले आणि तिसऱ्या दिवशी भारताला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार फाफ डु प्लेसिस याने डीन एल्गार याच्या साथीने संघाचा डाव सावरला. लंचपर्यंत भारताकडे 349 धावांची आघाडी आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिला डाव 7 बाद 502 धावांवर दुसऱ्या दिवशी घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकन 39 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर, चौथ्या दिवशी खेळ सुरु होताच डीन एल्गार आणि उपकर्णधार टेंबा बावुमा आक्रमक खेळ खेळत होते. पण, इशांत शर्मा याने बावुमाला 18 बावुमाला एलबीडब्ल्यू आउट करत तिसऱ्या दिवशी भारताला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार फाफ डु प्लेसिस याने डीन एल्गार याच्या साथीने संघाचा डाव सावरला. यादरम्यान, एल्गारने 14 वे अर्धशतक पूर्ण केले आणि लंचपर्यंत आफ्रिकेने 4 बाद 153 धावा केल्या. लंचपर्यंत भारताकडे 349 धावांची आघाडी आहे. टीम इंडियासाठी आजवर रविचंद्रन अश्विन याने 2, रवींद्र जडेजा याने 1 तर इशांतला 1 विकेट मिळाली.
यापूर्वी दुसर्या दिवशी भारताने पहिल्या डावात 463 धावांची आघाडी घेतली होती. दिवसाच्या शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करताना 39 गडी धावांत गमावले. एडन मार्कराम (Aiden Markram) याला अश्विनने 5 धावांच्या वैयक्तिक धावांवर बोल्ड केले. थेनिस डी ब्रूयन याने 4 धावा केल्या आणि रिद्धिमान साहा याच्याकडे अश्विनच्या चेंडूवर झेलबाद झाला. डेन पायटेड (Dane Piedt) शून्यावर जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये यजमान संघाने आपले वर्चस्व बनवून ठेवले आहेत. दुसऱ्या दिवशी भारताने 7 बाद 502 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. मयंक अग्रवाल (Maynak Agrawal) याने 215 धावा केल्या, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पहिले टेस्ट दुहेरी शतक हुकले आणि हिटमॅन 176 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकाने 3 विकेट गमावत 39 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने टेस्टमध्ये पहिल्यांदा रोहितला सलामीला पाठवले. दुसऱ्या दिवशीदेखील रोहित आणि मयंकने शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. रोहित दीडशेचा टप्पा पार करत बाद झाला तर मयंकने टेस्ट करिअरमधील पहिले दुहेरी शतक पूर्ण केले.