Live Streaming of IND vs SA, 1st Test Day 2: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग Hotstar वरही पाहता येणार आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या दिवशी टॉस जिंकून वर्चस्व राखल्यानंतर भारत दुसऱ्या दिवशीदेखील आघाडी मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दोन्ही संघातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदा टेस्टमध्ये सलामीला आलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जोडीदार मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. रोहित आणि मयंकने पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी 200 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकाई गोलंदाज पहिले यश मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. पहिल्या दिवशी आफ्रिकाई गोलंदाजांना एकही विकेट घेता आली आणि भारतीय सलामी जोडीने सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळवले होते. इथे पहा भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या टेस्टचा स्कोर कार्ड

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि एचडी चॅनेलवर सामना पाहता येईल. शिवाय, लाइव्ह स्ट्रीमिंग Hotstar वरही पाहता येणार आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वनडे आणि टी-२० नंतर पहिल्यांदा रोहित सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या दिवसाखेर रोहितने 115 आणि मयंकने 84 धावा केल्या होत्या. लंचपर्यंत रोहितने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर मयंकने चौथे अर्धशतक केले. अखेरीस रोहितने 84 चेंडूंत सेनुरन मुथुसामी याच्या गोलंदाजीवर चौकारासह 11 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. मयंकच्या अर्धशतकानंतर रोहितने आपले चौथे टेस्ट शतक केले. रोहितने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा उचलला. रोहितने 154 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं शतक झळकावले. रोहितने तब्बल 10 डावांनंतर 100 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने 2017 मध्ये नागपूर येथे श्रीलंकाविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (Test Championship) मधील ही भारताची तिसरी सामना आणि दुसरी कसोटी मालिका आहे. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले.