IND vs SA 1st Test 2019: 'क्रिकेट मॅच पाहणे का सोडले', या प्रश्नावर रविचंद्रन अश्विन याची मजेदार प्रतिक्रिया, पहा Video

यावर अश्विनने एक मजेदार प्रतिसाद दिला. या उत्तरावर अश्विनच नव्हे तर तिथे उपस्थित पत्रकारांना देखील त्यांचे हसू अनावर झाले.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: AP/PTI)

मागील वर्षी डिसेंबरपासून पहिली कसोटी खेळणारा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला की, मागील दहा महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहणे आपल्यासाठी इतके अवघड आहे की त्याने खेळ पाहणे बंद केले होते. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात पहिले फलंदाजी करताना भारताने आपला डाव 502 धावांवर घोषित केला. दक्षिण आफ्रिकेने जिद्दीने भारतीय संघाच्या (Indian Team( फिरकी गोलंदाजांचा सामना केला आणि तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट्स गमावत 385 धावा केल्या आहेत. यानंतर पत्रकार परिषदेत अश्विनला, 'काही काळापूर्वी त्याने क्रिकेट मॅच पाहणे का थांबविले', असे विचारले गेले. यावर अश्विनने एक मजेदार प्रतिसाद दिला. या उत्तरावर अश्विनच नव्हे तर तिथे उपस्थित पत्रकारांना देखील त्यांचे हसू अनावर झाले. (IND vs SA 1st Test Day 3: रवींद्र जडेजा याने सर्वात वाईट चेंडू टाकण्याची केली पुनरावृत्ती, सोशल मीडियावर चाहते करत आहे ट्रोल Video)

पत्रकाराच्या त्या प्रश्नावर अश्विनने त्याची फिरकी घेत सांगितले की "सुरवातीस, माझ्याकडे दोन मुलं आहेत जी रात्री फारशी झोपत नाहीत." पण नंतर गंभीरपणे सांगितले की, " याव्यतिरिक्त, मला असे वाटले की प्रत्येक वेळी मी जेव्हा टीव्हीवर हा खेळ पाहतो, मला असे वाटते की मला हा खेळ खेळायचा आहे आणि मी तो सामना मिस करत आहे. हे अगदी नैसर्गिक आहे, प्रत्येकजण त्यातून जातो, असे अश्विन म्हणाला.

 

View this post on Instagram

 

🗣️ Reporter: Why did you stop watching cricket 📺📺 😁 Ashwin: I have two kids 👧🏻👧🏻 and got drawn towards books 📖 & archaeology 🧐🧐 #TeamIndia #INDvSA

A post shared by Team India (@indiancricketteam) on

जुलै 2017 पासून भारताकडून एकमेव कसोटी क्रिकेट खेळणारा अश्विन 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडिलेड कसोटी खेळला होता. त्यानंतर त्याला 11 कसोटींमध्ये कोणत्याही सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. यादरम्यान, अश्विनने नॉटिंगहॅमशायरमध्ये काउंटी क्रिकेट खेळले आणि टीएनपीएलमधील सामनेदेखील खेळले. दुसरीकडे, सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात अश्विनने गोलंदाजी करत पाच गडी बाद केले.