IND vs SA 2nd T20I: विराट कोहली चं No 1, 'हिटमॅन' रोहित शर्मा चे 'हे' 2 वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत
कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे 22 वे अर्धशतक ठोकले. कोहलीने आता इतर कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा पुरुष टी-20 मध्ये अधिक धावा केल्या आहेत.
मोहाली येथे खेळण्यात आलेल्या भारत (India)-दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व राखत 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मॅचमध्ये अर्धशतक झळकावत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने इतिहास रचला आहे. मोहालीच्या पीसीए क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या दुसर्या सामन्यात कोहलीने शानदार फलंदाजी करत नाबाद 72 धावांची खेळी केली. यासह विराटने एक विश्वविक्रम आपल्या नंबर केला आहे. कर्णधार कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे 22 वे अर्धशतक ठोकले. (IND vs SA 2nd T20I: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय; विराट कोहली चे शानदार अर्धशतक)
या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे 22 वे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह कोहलीने क्रिकेटच्या या स्वरुपात 21 अर्धशतके झळकावण्याचा टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा विश्वविक्रम मोडला. शिवाय, कोहलीने आता इतर कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा पुरुष टी-20 मध्ये अधिक धावा केल्या आहेत. यासाठी त्याने पुन्हा एकदा रोहितला मागे टाकले. विराटने आजवर टी-20 मध्ये 2441, तर रोहितने 2434 धावा केल्या आहेत. विराट अव्वल क्रमांकावर तर रोहित दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा सामना खेळला नव्हता. आणि या सामन्यात तो दोन षटकारांच्या मदतीने 12 चेंडूत 12 धावांवर बाद झाला. तर कोहलीने दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावून त्याला मागे सोडले. आता पुढच्या सामन्यात रोहित विराटची बरोबरी करू शकेल की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. कोहलीने 52 चेंडूंत 72 धावा फटकावल्या, ज्यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या डावात विराटचा स्ट्राईक रेट 138.46 होता. थोड्या दिवसांपूर्वीच विराटने क्षेत्ररक्षण करताना दक्षिण आफ्रिकेचा संघाचा कर्णधार क्विंटन डिकॉक याचा शानदार झेल टिपला आणि 150 धावा करण्यापूर्वी संघाला रोखण्यात यश आले.