IND vs SA 1st ODI: पहिल्या सामन्यात बनू शकतात 'हे' 5 प्रमुख रेकॉर्ड, विराट कोहली ची 'या' वर्ल्ड रेकॉर्डवर नजर

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नजर सध्या आपल्या फलंदाजीत सुधार करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यावर असेल. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू काही महत्तवपूर्ण रेकॉर्डस् बनवू शकतात. जाणून घ्या

विराट कोहली आणि शिखर धवन (Photo Credit: IANS)

न्यूझीलंड दौर्‍यावर क्लीन स्वीपला सामोरे गेल्यावर भारतीय संघ (Indian Team) गुरुवारी येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. धर्मशालाच्या (Dharmasala) हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा सामना थोड्याच वेळात सुरु होईल. यापूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 3-0 ने पराभव पत्करावा लागला होता, तर दक्षिण आफ्रिका टीमने घरच्या मैदानावर खेळत ऑस्ट्रेलियाचा व्हाईट वॉश केला. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर आफ्रिकेचा सर्व फॉरमॅटमध्ये सात मालिकेनंतर हा पहिला मालिका विजय होता. अखेरीस दक्षिण आफ्रिका 2019मध्ये भारत दौऱ्यावर आला होता, जिथे त्यांना टेस्टमध्ये 3-0 पराभव सहन करावा लागला आणि टी-20 1-1ने बरोबरीत राहिली होती. (IND vs SA ODI 2020: दक्षिण आफ्रिकेचे 'हे' 3 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक, रहावे लागणार सावध)

दुसरीकडे, भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नजर सध्या आपल्या फलंदाजीत सुधार करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यावर असेल. विराटची बॅट न्यूझीलंड दौऱ्यावर शांत राहिली आहे, त्यामुळे तो यंदाच्या मालिकेत फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू काही महत्तवपूर्ण रेकॉर्डस् बनवू शकतात. जाणून घ्या:

1. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने आजवर 21,901 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात 99 धावा करताच विराट सर्वात जलद 22,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनेल.

2. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याने 957 धावा आणि 54 गडी बाद केले आहेत. या सामन्यात त्याने 43 धावा केल्या तर तो वनडेमध्ये 1000 धावा आणि 50 गडी बाद करणारा 13वा खेळाडू बनेल.

3. हेनरिक क्लासेनने 16 डावांमध्ये 493 धावा केल्या आहेत. 7 धावा करताच तो 500 वनडे धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा 44 वा फलंदाज बनणार आहे.

4. कोहलीच्या नेतृत्वात भारताने सलग 4 वनडे सामने कधीही गमावले नाहीत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिला सामना गमावल्यास विराटच्या नावावर या रेकॉर्डची नोंद होईल.

5. कोहली सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 12,000 धावा पूर्ण करण्यापासून 133 धावा दूर आहे. हा पराक्रम गाठणारा कोहली हा फक्त दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. शिवाय, इतर वेगवान फलंदाजांना मागे टाकत सर्वात जलद 300 डावांमध्ये कामगिरीची नोंद करेल.

यंदा दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळेल. रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर असल्याने शिखर धवनसहपृथ्वी शॉ डावाची सुरूवात करेल. केएल राहुल विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळेल आणिमधल्याफळीत फलंदाजी करेल. यामुळे, रिषभ पंतला पुन्हा प्लेयिंग इलेव्हनमधून बाहेर बसण्याची शक्यता दिसत आहे.