IND vs SA 1st ODI 2022 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
2018 मध्ये भारताच्या शेवटच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर दोन्ही संघांमधील ही पहिली वनडे मालिका असेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
IND vs SA 1st ODI 2022 Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामी देण्याचे ध्येय ठेवून नवीन सुरुवात करण्याच्या इराद्याने पार्लच्या (Paarl) मैदानात उतरेल. भारतीय संघाने (Indian Team) दक्षिण आफ्रिकेतील पहिला कसोटी मालिका विजय गमावला. कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केल्यानंतर पुढील संघाने दोन कसोटी गमावल्या. भारतीय संघाचा नवा एकदिवसीय कर्णधार केएल राहुल (KL Rahul) संघाला शानदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. 2018 मध्ये भारताच्या शेवटच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर दोन्ही संघांमधील ही पहिली वनडे मालिका असेल. यापूर्वीच्या Proteas दौऱ्यावर पाहुण्या संघाने सहा सामन्यांच्या मालिकेत 5-1 असा संस्मरणीय विजय मिळवला होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs SA ODI 2022: टीम इंडिया ‘या’ 2 धुरंधर फलंदाजांवर विसंबून, 9 पैकी 5 फलंदाज आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेशी भिडले नाही)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 19 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना पार्लच्या बोलंड पार्क येथे होणार आहे. दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1:30 वाजता होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर हिंदी-इंग्रजीशिवाय इतर प्रादेशिक भाषांमध्येही पाहू शकता. तर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघ पहा.
टीम इंडिया: केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका: टेंबा बावुमा (कॅप्टन), झुबेर हमझा, जनेमन मलान, एडन मार्करम, डेविड मिलर, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जॅन्सन, वेन पारनेल, आंदिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, क्विंटन डी कॉक, काइल वेरेने, केशव महाराज, सिसंदा मगाला, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी.