IND vs PAK World Cup 2023 Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असेल वर्चस्व? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 1.30 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.
एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादला (Ahmedabad) पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहोचणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 1.30 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय संघाला आपला वेग कायम राखायचा आहे, तर बाबर आझमच्या संघालाही भारताविरुद्ध विजयाची आशा असेल. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादच्या खेळपट्टीवर कोणाची मदत मिळणार ते जाणून घेऊया.
जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच चांगली मानली जाते. येथे फलंदाज वेगाने धावा काढू शकतात, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उच्च धावसंख्येचा खेळ पाहायला मिळतो. पण नवीन चेंडूमुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये खेळात नक्कीच असतील. येथे आतापर्यंत एकूण 29 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 धावांची आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 सामने जिंकले आहेत.
कसे असेल हवामान?
वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, शनिवारी अहमदाबादमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: IND vs PAK World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादला छावणी, सात हजार पोलिस आणि चार हजार होमगार्ड तैनात)
एकदिवसीय विश्वचषकासाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.