IND vs PAK U19 World Cup 2020: भारतीय गोलंदाजांची उत्तम कामगिरी, पाकिस्तान 172 धावांवर ऑलआऊट

अशा स्थितीत पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने 43.1 ओव्हरमध्ये 172 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले.

भारत अंडर-19 (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

आज आयसीसी अंडर-19 विश्वचषकातील (World Cup) 'महामुकाबले' चा दिवस आहे. आज भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे.या सामन्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफाइनल सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने 43.1 ओव्हरमध्ये 172 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले. टीम इंडियाने आज टॉस गमावला असला तरीही त्यांच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. सुशांत मिश्रा (Sushant Mishra) याने भारताकडून 3, रवी बिश्नोई आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. यशस्वी जयस्वाल, अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसरीकडे, पाकिस्तानकडून सलामी फलंदाज हैदर अली (Haider Ali) आणि कर्णधार रोहेल नजीर (Rohail Nazir) यांनी अर्धशतकी खेळी केली. मुहम्मद हारिस याने 26 धावांचे योगदान दिले, हैदर अली 56 आणि कर्णधार नजीरने 62 धावा केल्या.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि दुसर्‍या ओव्हरमध्ये मोहम्मद हुरैराची पहिली विकेट गमावली. यानंतर खाते न उघडता फहाद मुनीर पॅव्हेलियनमध्ये परतला,. एका टोकाला विकेट पडत असताना पाकिस्तानी कर्णधार नजीरने धीर सोडला नाही आणि सावधपणे धावा करत राहिला. हैदर अली आणि कर्णधार नजीरने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण नियमितपणे संघ विकेट गमावत राहिला.

आजच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार गर्गने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला प्लेइंग इलेव्हन, तर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध क्वार्टर फायनल सामन्यात खेळल्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नव्हता. मागील सामन्यात अर्धशतक झळकावणारा हुरैरा अवघ्या 4 धावा काढून माघारी परतला. यानंतर विश्नोईने फहाद मुनीरला एकही धाव न करता परत पाठविले. सलामी फलंदाज हैदरने 34 धावांत दोन गडी गमावल्यानंतर डाव हाताळला. हैदरने अर्धशतक झळकावत संघाला 100 धावांच्या जवळ आणले. 56 धावांच्या खेळीनंतर हैदरला यशस्वीने अथर्वकडे झेलबाद केले. 77 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने त्याने 56 धावा केल्या. हैदर बाद झाल्यानंतर पाकिस्तानला सततच्या धक्के बसत राहिले आणि 163 च्या धावसंख्येवर पाकिस्तानने 7 गडी गमावले. यानंतर कर्णधार नाझीरने अर्धशतकी खेळी साकारत संघाला सन्माननीय धावसंख्या बनवून दिली. नाझिरने 83 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, सुशांतने त्याला टिळक वर्माकडे 62 धावांवर कॅच आऊट केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif