IND vs PAK, T20 World Cup 2021: विराट कोहलीवर बाबर आजम वरचढ, भारताला 10 विकेटने नमवून पाकिस्तानने बदलला इतिहास, टी-20 विश्वचषकात विजयी सलामी
भारताविरुद्ध दुबई येथे झालेल्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 152 धवनचं माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 10 विकेटने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवला आणि यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
बाबर आजमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तान (Pakistan) संघाने अखेर टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत इतिहास बदलला आहे. भारता (India) विरुद्ध दुबई येथे झालेल्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 152 धवनचं माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 10 विकेटने कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानच्या दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवला आणि यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. बाबर 68 धावा तर रिझवान 79 धावा करून नाबाद परतले. भारतासाठी फलंदाजांच्या निराशाजनक खेळीनंतर गोलंदाजही प्रभाव पडू शकले नाही. सर्व मात्तबर गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले. अशाप्रकारे बाबर आजमचा पाकिस्तान संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात भारताला पराभवाची धूळ चरणारा पहिलाच बनला आहे. यापूर्वी 12 वेळा विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने आले होते ज्यात टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. (T20 World Cup 2021, IND vs PAK: शाहीन आफ्रिदी याच्या एका चुकीने टीम अभिनेता अक्षय कुमार सह टीम इंडिया चाहत्यांनी केला टाळ्यांचा गजर, पहा VIDEO)
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमने टॉस जिंकून भारताला फलंदाजीला बोलावले आणि त्याच्या गोलंदाजांनी तो निर्णय योग्य ठरवत विराटसेनेला अवघ्या 151 धावांवर रोखले. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सार्वधिक 57 धाव ठोकल्या. याशिवाय रिषभ पंतने 39 धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्य स्टार भारतीय फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांपुढे तग धरून खेळू शकले नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना स्टार पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवले. तर अखेरच्या षटकात विराटला देखील झेलबाद करत तंबूत धाडलं. पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध आजच्या सामन्यात तीनही विभागात वर्चस्व गाजवले आणि भारताविरुद्ध पहिल्या-वाहिल्या वर्ल्ड कप विजयाची नोंद केली. दरम्यान पाकिस्तान संघाच्या या विजयामुळे बाबर आजम भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत पराभूत करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे आतापर्यंत एकही पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत भारताला पराभूत करू शकला नव्हता.
दुसरीकडे, पाकिस्तान संघाने 152 धावांचा पाठलाग करताना उत्तम सुरुवात केली आणि सामन्यावर मजबूत पकड बनवली. कर्णधार बाबर आजम आणि रिझवानच्या सलामी जोडीने पाकिस्तानला एकही झटका बसू दिला नाही. दोघांनी भारताच्या स्टार गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि सुरुवातीपासून हल्ला चढवला.