IND vs PAK, T20 World Cup 2021: दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच खेळाडूंवर असणार सर्वांची नजर

भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत नेहमीच पाकिस्तानवर टीम इंडिया भारी पडली आहे. तर यंदा बाबर आजमच्या नेतृत्वात माजी विजेता संघ देखील भारताला आव्हान देण्यासाठी उत्सुक आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात या 5 खेळाडूंवर चाहत्यांची नजर असणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Twitter/BCCI, PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आणखी एका मनोरंजक हंगामानंतर, आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (ICC T20 Men's World Cup) 2021 कडे चाहत्यांचे लक्ष वळले आहे. आयसीसीची  (ICC) कोणतीही स्पर्धा नेहमीच खास असली तरी गेली काही वर्षे आयसीसी स्पर्धेची चर्चा पुढील स्तरावर पोहोचली आहे. यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान (Pakistan) स्पर्धेची पुनरारंभ. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संगहांनी कदाचितच जगभरातील क्रिकेट चाहत्यांची निराशा केली असेल. आता दोन्ही संघ 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत नेहमीच पाकिस्तानवर टीम इंडिया (Team India) भारी पडली आहे. तर यंदा बाबर आजमच्या नेतृत्वात माजी विजेता संघ देखील भारताला आव्हान देण्यासाठी उत्सुक आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात या 5 खेळाडूंवर चाहत्यांची नजर असणार आहे. (India Playing XI vs Pakistan: सराव सामन्यात टीम इंडिया पास, पण पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनवर अडकला पेच; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

1. विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून टी-20 विश्वचषक जिंकण्याची त्याची शेवटची संधी आहे. ‘किंग कोहली’ म्हणून प्रसिद्ध भारतीय कर्णधार यंदाच्या स्पर्धेत आपल्या पहिल्या टी-20 आंतराष्ट्रीय शतकाच्या शोधात असेल, परंतु मोठ्या सामन्यांमध्ये त्याचा विक्रम आपल्या सर्वांना माहित आहे. पाकिस्तानविरुद्ध कोहलीने आधीच काही संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत आणि पुन्हा एकदा मोठी खेळी करून भारताच्या मोहिमेला चमकदार सुरुवात करण्यावर तो अधिक भर देईल.

2. बाबर आजम (Babar Azam)

विराट भारतासाठी जे आहे तोच बाबर आजम पाकिस्तानसाठी आहे. खेळाच्या तीन स्वरूपांमध्ये त्याने मिळवलेल्या यशामुळे वेळोवेळी त्याची तुलना भारतीय कर्णधाराशी केली जाते. आजम निश्चितपणे जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे आणि भारताच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीचा सामना करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

3. रोहित शर्मा (Rohit Sharma)

‘हिटमॅन’ सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात सातत्यपूर्ण सलामीवीरांपैकी एक आहे. कोहली प्रत्येक मोठ्या स्पर्धेत केंद्रस्थानी असताना, रोहितने आपल्या अतुलनीय फलंदाजी शैलीने सर्वोत्तम गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या भारतीय खेळाडूंपासून पाकिस्तान नक्कीच सावध असेल.

4. फखर जमान (Fakhar Zaman)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 फायनलमध्ये भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा फखर जमानने ज्याप्रकारे सामना केला ते भारतीय चाहते कधीच विसरणार नाहीत. एका हाय-प्रोफाइल स्पर्धेच्या फायनलमध्ये सलामीवीराने केलेली ही सर्वात घातक खेळी होती. सुरुवातीला तो पाकिस्तानच्या प्राथमिक वर्ल्ड कप संघाचा भाग नव्हता आणि नंतर त्याला संघात समाविष्ट करण्यात आले. जमानचे लक्ष मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेण्यावर असेल.

5. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

आगामी भारत-पाकिस्तान लढतीत अनेक जागतिक दर्जाच्या फलंदाजांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, परंतु जर एखादा गोलंदाज जो या स्पर्धेत चमक दाखवेल, तर तो जसप्रीत बुमराह आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुमराहने भारताला जगातील सर्वोत्तम संघ बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. भारत या स्पर्धेत किती पुढे जातो हे बुमराह स्पर्धेत कशी कामगिरी करतो यावर बरेच काही अवलंबून असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now