IND vs PAK, ICC World Cup 2019: Team India ला आणखी एक दणका, भुवनेश्वर कुमारला हि झाली दुखापत, पुढे सामन्यात भाग घेणार नाही
भुवनेश्वर हा भारतीय संघातील दुसरा खेळाडू आहे ज्याला सामान्य दरम्यान दुखापत झाली आहे.
भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळताना एक मोठा दणका बसला आहे. भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यापुढे मॅचमध्ये खेळणार नाही. भुवनेश्वरच्या पायांचे स्नायु अकडल्याने तो पुठे गोलंदाजी करू शकला नाही आणि त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणार नाही. भुवनेश्वरने तिसऱ्या षटकेच्या चौथ्या चेंडू टाकल्यावर त्याच्या डाव्या हाताचे स्नायु अकडल्याचे जाणवले आणि सावधानी म्हणून त्याने पॅव्हेलियनला परतण्याचा निर्णय घेतला. फील्डवर भुवनेश्वरची जागा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने घेतली आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: आऊट नसतानाही विराट कोहलीने सोडले मैदान, भडकले फैंस)
भुवनेश्वर हा भारतीय संघातील दुसरा खेळाडू आहे ज्याला सामान्य दरम्यान दुखापत झाली आहे. तत्पूर्वी भारताच्या सामनावीर शिखर धवन (Shikhar Dhawan) ला ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळताना उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे धवनला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली होती. सध्या विश्वकप मध्ये भुवनेश्वर ने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, भारताने (India) प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान (Pakistan) समोर 337 धावांचं तगडं आव्हान उभं केलं आहे. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) ने 113 चेंडूत शानदार 140 धावांची आक्रमक खेळी केली. दुसरीकडे के. एल. राहुल (KL Rahul) ने त्याला पुरेपूर साथ देत 57 धावांची संयमी खेळी केली. विराट कोहली (Virat Kohli) ने देखील 65 चेंडूत दमदार 77 धावा केल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)