IND vs PAK, ACC U19 Asia Cup 2024 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत डिशवर उपलब्ध असेल का? येथे संपूर्ण तपशील जाणून घ्या
त्यामुळे भारत अंडर 19 विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील मिळणार नाही.
India National Under-19 Cricket Team vs Pakistan National Under-19 Cricket Team Live Telecast: भारतीय अंडर-19 क्रिकेट टीम विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK)अंडर-19 क्रिकेट टीम आशिया चषक 2024 चा(ACC Men's U19 Asia Cup 2024) तिसरा एकदिवसीय सामना आज 30 नोव्हेंबर (शनिवारी) दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत 'ब' गटात पाकिस्तानसह जपान आणि यूएईसोबत आहे. तर गतविजेत्या बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळला 'अ' गटात ठेवण्यात आले आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम या दोन ठिकाणी अंडर-19 आशिया कप खेळवला जात आहे. फ्री डिशवर पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. (हेही वाचा: BAN W vs IRE W 2nd ODI Toss Updates: आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, बांगलादेश महिला संघ प्रथम गोलंदाजी करणार)
सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का?
डीडी स्पोर्ट्सला भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपणाचे अधिकार मिळालेले नाहीत. त्यामुळे भारत अंडर 19 vs पाकिस्तान अंडर 19 आशिया चषक सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील मिळणार नाही. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. Sony Liv ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे क्रिकेट चाहत्यांना या हाय-व्होल्टेज सामन्याचा आनंद घेता येईल.