IND vs NZ WTC Final 2021 Reserve Day: सहाव्या दिवशी टीम इंडियाला करावे लागणार हे काम, नाहीतर संयुक्त विजेतेपदावर मानावे लागणार समाधान

अशास्थितीत टीम इंडियाला जर सामना टाय किंवा अनिर्णित करायचा नसेल तर त्यांना आता टी-20 स्टाईल बॅटिंग करत विशाल आव्हान उभी करावी लागेल.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात साउथॅम्प्टन (Southampton) येथे सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  (World Test Championship) फायनल सामन्याचा आज सहाव्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन आघाडीच्या संघातील कसोटी अंजिक्यपदाचा हा निर्णायक सामना आता रोमांचक स्थितीत पोहचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सामना तेव्हा टीम इंडियाने दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावा केल्या असून किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली होती. अशाप्रकारे आता पावसाने बाधित झालेल्या या अंतिम सामन्याच्या शेवटच्या सहाव्या, राखीव दिवसाचा खेळ होणार आहे. अशास्थितीत टीम इंडियाला (Team India) जर सामना टाय किंवा अनिर्णित करायचा नसेल तर त्यांना आता टी-20 स्टाईल बॅटिंग करत विशाल आव्हान उभी करावी लागेल. (IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडची शिस्तबद्ध बॉलिंग, दिवसाखेर भारताकडे 32 धावांची आघाडी; सामना रोमांचक स्थितीत)

साउथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे आज दिवसाच्या दिवसाचे पहिले सत्र टीम इंडियासाठी महत्वपूर्ण असणार आहे. भारतीय संघाला या सत्रात जबरदस्त बॅटिंग करत मोठी धावसंख्या गाठणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे डाव घोषित केल्यावर किवी फलंदाजांना बाद करून संघासाठी विजेतेपद पटकावण्याची संपूर्ण मदार असेल. पण पाचव्या दिवशी मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांची गोलंदाजी पाहता भारतीय संघाची विजेतेपदाची आशा अद्यापही कायम आहे से म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मूलतः 18 जून रोजी सुरु होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या आणि चौथ्या दिवसाच्या खेळात पावसाने नियमित अंतराने अडथळा आणला ज्यामुळे दोन्ही दिवसाचा खेळ धुवून निघाला. अशास्थितीत आता 23 जून रोजी आता सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ रंगणार आहे.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे विजेतेपदाचा हा सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल. तसेच अखेरच्या दिवशी पावसाने खेळ खराब न केल्यास दोघांपैकी एक संघ विजेतेपद पटकावले अशी आशा दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींना असेल. त्यामुळे आता आज निर्णायक दिवशी कोण बाजी मारेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून असेल.