IND vs NZ WTC Final 2021: ऐतिहासिक लढतीसाठी न्यूझीलंडने अद्याप का नाही केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा, जाणून घ्या कारण

किवी प्रशिक्षक स्टेड यांच्यानुसार त्यांनी अद्याप अंतिम संयोजनाबाबत निर्णय घेतलेला नाही आहे आणि नाणेफेक होईपर्यंत ते सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेईल अशी वस्तुस्थिती त्यांनी स्वतः उघड केली आहे.

केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यासाठी भारताविरुद्ध (India) न्यूझीलंड (New Zealand) संघाच्या अंतिम 11 धुरंधर खेळाडूंबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे, पण न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stead)  याबाबत चिंतीत दिसत नाही. किवी प्रशिक्षक स्टेड यांच्या म्हटल्या नुसार त्यांनी अद्याप अंतिम संयोजनाबाबत निर्णय घेतलेला नाही आहे आणि नाणेफेक होईपर्यंत ते सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेईल अशी वस्तुस्थिती त्यांनी स्वतः उघड केली आहे. निर्णायक लढतीच्या काही तासांपूर्वी टीम इंडियाने त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती आणि त्यात अपेक्षित खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घेण्यासाठी कर्णधार केन विल्यमसन  (Kane Williamson) स्वतः बोलत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (ICC World Test Championship 2021 Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ जाहीर, हे '11' खेळाडू देणार न्यूझीलंडच्या संघाला टक्कर)

स्टेड यांनी गुरुवारी सांगितले की, “[आमची टीम] जाणून घेऊ इच्छित भारतीय लोकांची संख्या आश्चर्यकारक आहे. आम्ही मैदानावर उतरल्याशिवाय उद्यापर्यंत होल्डवर ठेवले आहे.” यामागील कारण विचारले असता प्रशिक्षक स्टेड म्हणाले की वेगवान गोलंदाज की फिरकीपटूंना संधी द्यायची हे आम्ही खेळपट्टीची पाहणी केल्यावर निश्चित करू. न्यूज 18 च्या हवाल्यानुसार त्यांनी म्हटले की, “जितकी हिरवी खेळपट्टी तितकी वेगवान गोलंदाज खेळण्याची शक्यता अधिक असते. पिच तपकिरी किंवा धुळीची खेळपट्टी आहे तेव्हा आपण फिरकी गोलंदाज किंवा हळू गोलंदाज खेळण्याची शक्यता जास्त असते.” विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या ब्लॉकबस्टर अंतिम सामन्यात भारताने प्रवेश मिळवला आहे. तथापि, डब्ल्यूटीसी चक्रात त्यांचा एकमेव पराभव न्यूझीलंडविरुद्ध 2020 मध्ये झाला होता.

दरम्यान, टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अपेक्षित खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला उतरेल तर रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन या दोन फिरकीपटूंना संधी दिली गेली आहे. जडेजा आणि अश्विन बॅटिंगने देखील संघासाठी उपयुक्त कामगिरी करण्यास सक्षम आहेत. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif