IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीला चिअर करण्यासाठी भारत आर्मीने गायले गाणे, व्हायरल Video पाहून तुम्हीही थिरकाल

आयसीसीने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. 

भारत आर्मीने विराटसाठी गायले गाणे (Photo Credit: Twitter, PTI)

IND vs NZ WTC Final 2021: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (VIrat Kohli) सध्या न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा निर्णायक सामना खेळत आहे. पहिल्या दिवशी पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे सामना सुरु होऊ शकला नाही मात्र दुसऱ्या दिवशी अनुकूल वातावरण असल्यामुळे अखेर प्रेक्षकांच्या उपस्थितीत कसोटी अजिंक्यपदाच्या निर्णायक सामन्याला सुरुवात झाली. दुसर्‍या दिवशी टीम इंडियाने (Team India) फलंदाजी केली आणि तीन गडी गमावून 143 धावा केल्या. कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे क्रीजवर आहेत. एजस बाउल येथील सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारत आर्मीने (Bharat Army) रनमशीन कोहलीसाठी एक विशेष गाणे गायले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आयसीसीने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. (IND vs NZ ICC WTC Final 2021: विराट कोहली विरोधात पंचांच्या रिव्यूमुळे उडाला गोंधळ, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण)

व्हिडीओमध्ये भारत आर्मीचा एक सदस्य कोहलीसाठी रॅप गाताना दिसत आहे. एकीकडे भारतीय खेळाडूंनी मैदानावर आपले कौशल्य दाखवत असताना दुसरीकडे चाहते देखील मैदाना बाहेर टीम इंडियाला उत्तम प्रकारे पाठिंबा देत आहेत.भारत आर्मी, ज्यांना भारतीय संघाचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे म्हटले जाते, सध्या आपल्या आवडत्या संघाचे समर्थन करण्यासाठी साउथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे उपस्थित आहेत. भारत आर्मी त्यांच्या शैलीत 'वी विल रॉक यू' हे गाणे गाऊन टीम इंडिया आणि कॅप्टन कोहलीला चिअर करताना दिसली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आर्मीचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्याला यूजर्सची जबरदस्त पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

सामन्याबद्दल बोलायचे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावांच्या शानदार भागीदारीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर संघाने लागोपाठ तीन विकेट गमावल्या पण विराट-रहाणेच्या जोडीने संघाला दिवसाखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही. दोंघाच्या खांद्यावर आता संघाचा डाव सांभाळण्याची मदार आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारताला चांगली सुरुवात केली परंतु खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने तीन गडी गमावून 146 धावा केल्या.



संबंधित बातम्या