IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा च्या जागी 'या' खेळाडूची वर्णी

न्यूझीलंड विरुद्ध (India Vs Newzealand) टी-20 सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी मालिकेत ब्रेक घ्यावा लागणार आहे, मात्र आता त्याच्या जागी अखेरीस भारतीय कसोटी संघात युवा शुभमन गिल (Shubhman Gill) याची निवड करण्यात आल्याचे समजतेय .

Shubhman Gill (Photo Credit: Getty Image)

न्यूझीलंड विरुद्ध (India Vs Newzealand)  टी-20 सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी मालिकेत ब्रेक घ्यावा लागणार आहे.मागील काही सामन्यांमधील आणि आतापर्यंतचे रोहितचे सर्व रेकॉर्ड पाहता हा टीम इंडिया (Team India) साठी सर्वात मोठा धक्का असणार आहे, मात्र आता त्याच्या जागी अखेरीस भारतीय कसोटी संघात युवा शुभमन गिल (Shubhman Gill) याची निवड करण्यात आल्याचे समजतेय . बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भारत अ संघाकडून खेळत असताना कसोटी सामन्यात शुभमन गिलने नाबाद 204 धावांची खेळी केली. या खेळीमुळे कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. IND vs NZ: हार्दिक पंड्या Unwell! न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत नसणार टीम इंडियाचा ऑल राउंडर

न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला आहे , मात्र अखेरच्या सामन्यात रोहित शर्माला झालेल्या दुखापतीने या आनंदावर काहीसे पाणी फिरले आहे. या अगोदरच पाठीच्या दुखण्याने ऑल राउंडर हार्दिक पंड्या आणि हाताच्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन या मालिकेपासून दूर झाले होते, त्यात आता रोहित शर्माला सुद्धा दुखापत झाल्याने कोहली ब्रिगेड समोर मोठे आव्हान असणार आहे.

दरम्यान बुधवार पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघ न्यूझीलंडचं आव्हान कसं पेलवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.