IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध संघात ‘या’ तडाखेबाज खेळाडूंची एन्ट्री, केन विल्यमसनच्या अडचणीत वाढ
या पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध आपल्या आगामी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकते.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये टीम इंडियाची (Team India) सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारतीय संघाच्या (Indian Team) निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सोपा असणार नाही, कारण न्यूझीलंडमध्ये अनेक मॅच विनर खेळाडू आहेत जे काट्याची टक्कर देतील. दरम्यान पाकिस्तानविरुद्ध पराभवांनंतर किवी संघाविरुद्ध हा सामना देखील गमावलास टीम इंडियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याचे संकटही ओढवू शकते. अशा परिस्थितीत टीम इंडिया कोणताही धोका पत्करू इच्छित नसेल. टीम इंडिया आपल्या आगामी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकते. (T20 World Cup 2021: टीम इंडियाविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत ‘हा’ संघ आहे अजेय, वर्ल्ड टी-20 मधेही भारत नाही काढू शकला तोडगा)
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती दिली जाऊ शकते. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अश्विनच्या जागी चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. कर्णधार विराट कोहलीचे हे निर्णय चुकीचे ठरले. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध संघातील अन्य तडाखेबाज खेळाडूंनी संधी मिळू शकते.
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)
हार्दिक पांड्याचा पाकिस्तानविरुद्ध फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. तथापि या सामन्यात त्याला काही छाप पाडता आली नाही. अशा परिस्थितीत पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. ठाकूर चेंडू आणि बॅटने दम दाखवण्यात माहीर आहे. मात्र क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये ठाकूरने स्वतःची योग्यता सिद्ध करणे अद्याप शिल्लक आहे. आयपीएल 2021 मध्ये 16 सामने खेळले, ज्यात त्याने एकूण 21 विकेट घेतल्या.
ईशान किशन (Ishan Kishan)
पाकिस्तानविरुद्ध पहिला टी-20 विश्वचषक सामना खेळताना सूर्यकुमार यादवची कामगिरी निराशाजनक होती आणि संघ अडचणीत असताना तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या जागी कर्णधार विराट कोहली युवा फलंदाज किशनला संधी देऊ शकतो, किशन एक उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. चौथ्या क्रमांकावर ईशानचे स्थान निश्चित केले असून त्याने आपल्या वेगवान फलंदाजीने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे.
आर अश्विन (R Ashwin)
पाकिस्तानविरुद्ध भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही आणि सलामी फलंदाजांनी जबरदस्त धावा लुटल्या. अश्विनच्या जागी चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र कर्णधार कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. अशा परिस्थितीत चक्रवर्तीला न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते आणि अश्विनचे टी-20 प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल चार वर्षानंतर कमबॅक होऊ शकते.