IND vs NZ, ICC CWC 2019 Semi-Final: टीम इंडियाच्या पराभवानंतर एडम गिलक्रिस्ट ने केले धोनी चे समर्थन, Tweet वाचून फॅन्स होतील खुश

गिलख्रिस्टने धोनीच्या समर्थनात एक खास ट्विट केले आहेत आणि ते वाचून माहीच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.

एडम गिलक्रिस्ट आणि एम एस धोनी (Photo Credits: Getty Images)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एम एस धोनी (MS Dhoni) याच्या संथ फलंदाजीवर टीका केली जात आहे. सेमीफायनल सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. सेमीफायनलमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि धोनी वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. न्यूझीलंडविरुद्ध धोनी 72 चेंडूत 50 धावा काढून बाद झाला. मार्टिन गुप्टिल (Martin Guptil)च्या थेट फेकीवर तो धावबाद झाला. धोनीच्या प्रयत्नांनंतरही अनेक सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या कामगिरीने निराश आहेत. (एम एस धोनी याच्या निवृत्ती बद्दल होणार्‍या चर्चेवर लता मंगेशकर यांचे भावनिक ट्विट, टीम इंडियासाठी शेअर केला खास व्हिडिओ)

पण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने धोनीला पाठिंबा देत त्याचे समर्थन केले आहेत. गिलख्रिस्टने धोनीच्या समर्थनात एक खास ट्विट केले आहेत आणि ते वाचून माहीच्या चाहत्यांना खूप आनंद होईल. गिलख्रिस्टने लिहिले, "आपण पुढे खेळणार की नाही हे मला माहित नाही परंतु तुम्ही या खेळाला भरपूर काही दिले आहे. मी नेहमीच तुमच्या शांत स्वभाव आणि आत्मविश्वासाचा चाहता राहिला आहे."

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध धोनी व्यतिरिक्त जडेजाने देखील प्रभावी काम गिरी केली. जडेजा आणि धोनी यांनी मात्र सावध पण आक्रमक फलंदाजी करत संघाचे आव्हान कायम ठेवले. जडेजाने धोनीसोबत 100 धावांची भागिदारी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात जडेजा 77 धावांवर बाद झाला.