IND vs NZ: भारताच्या लाजिरवाण्या पराभावाच खापर IPLवर, #BANIPL मोठ्याप्रमाणात होतोय ट्रेट

सामन्यातील खेळाडुच्या कामगीरी बद्दल भारतीय चाहते प्रंचड नाराज आहे, त्यामुळे IPL बंद व्हावी अशी मागणी भारतीय चाहते करत आहे.

IPLBAN (Photo Credit - Instagram)

पाकिस्तान (Pakisthan) आणि आता न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभव स्वीकारावा लागल्याने भारताची विश्वचषकातील अवस्था बिकट झाली आहे. सेमीफायनलमध्ये भारताचं पोहचणं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही. पण या पराभावामुळे भारतीय चाहते मोठ्याप्रमाने संतापले आहे.  विश्वचषकातील पराभावच खापर त्यांनी IPL वर फोडले आहे. सामन्यातील खेळाडुच्या कामगीरी बद्दल भारतीय चाहते प्रंचड नाराज आहे, त्यामुळे IPL बंद व्हावी अशी मागणी भारतीय चाहते करत आहे. IPLचा दुसरा टप्पा UAE मध्ये खेळवला गेला होता आणि त्यानंतर लगेच T-20 WCला सुरुवात झाली. पण भारतीय खेळाडू IPLला जास्त महत्व देतात अस भारतीय चाहत्यांना वाटू लागल आहे. (हे ही वाचा IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव, हॅटट्रिकसह विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात न्यूझीलंड यशस्वी.)

भारतीय संघाच्या पराभावामुळे सोशल मीडियावर #BANIPL ट्रेड मोठ्याप्रमाणात होत आहे, त्यामुळे IPL बंद करावी असे भारतीय चाहते म्हणत आहे.

 

 

 

 

 

दुबई येथे झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या  (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात किवी संघाने भारतीय गोलंदाजांना चोपून काढलं आणि फटाफट क्रिकेटच्या विश्वचषकात भारताला तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली. याशिवाय यंदाच्या स्पर्धेत किवी संघाचा हा पहिला विजय देखील ठरला आहे. टीम इंडियाने (Team India) किवी संघापुढे अवघे 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात विल्यम्सनच्या संघाने 14.3 ओव्हरमध्ये शानदार विजय मिळवला.