IND vs NZ 3rd Test 2024: मुंबई कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माची मोठी खेळी, युवा वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात केला समावेश
मिळालेल्या माहितीनुसार तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी हर्षित राणाची निवड झाली आहे.
मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (IND vs NZ 3rd Test 2024) 1 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. मालिका गमावलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये (Team India) मोठा बदल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी हर्षित राणाची निवड झाली आहे. बंगळुरूमधील मालिकेच्या सुरुवातीला हर्षित राणाला भारतीय संघात प्रवासी राखीव म्हणून समाविष्ट करण्यात आले होता, नंतर त्याला आसामविरुद्ध दिल्लीच्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी सोडण्यात आले.
रणजी सामन्यात चमकदार कामगिरी
हर्षित राणाने दिल्लीकडून खेळताना आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने सात विकेट घेतल्या होत्या, याशिवाय त्याने अर्धशतकी खेळीही खेळली होती. दिल्ली संघाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. (हे देखील वाचा: IND vs NZ 3rd Test, Wankhede Stadium Stats And Pitch Report: वानखेडे स्टेडियमवर रंगणार टीम इंडिया आणि न्यूझीलंडचा सामना; खेळपट्टीचा अहवाल, रेकॉर्ड, सर्वाधिक धावा, विकेट्सची आकडेवारी घ्या जाणून)
हर्षित राणा करू शकतो पदर्पण!
तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत ब्रेक दिला जाऊ शकतो आणि त्याच्या जागी हर्षित राणालाही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. हर्षित राणा आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता, जिथे त्याने 19 विकेट घेतल्या होत्या. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता संघाने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. यानंतर दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने आठ विकेट्स घेतल्या. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.