IND vs NZ 3rd T20I: तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारत आणि न्यूझीलंडला याबाबत दिली वॉर्निंग
जयपूर आणि रांचीमध्ये न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता कोलकात्यात पोहोचली आहे.
कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) रविवारी होणाऱ्या तिसर्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी शुक्रवारी संध्याकाळी केवळ परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी मैदानाला भेट दिली आणि संघांना दवबाबत वॉर्निंग दिली. जयपूर आणि रांचीमध्ये न्यूझीलंडला (New Zealand) पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता कोलकात्यात पोहोचली आहे, जिथे किवी टीमचा क्लीन स्वीप करण्याकडे त्यांचे लक्ष्य असेल. नियमित टी-20 कर्णधार रोहित शर्माची ही पहिलीच मालिका आहे, ज्यामध्ये त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. यामुळे त्यांना परिस्थितीचा फायदा घेता आला. तसेच गोलंदाज आणि फलंदाजांची कामगिरीही चांगली झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी गांगुलीने दोन्ही संघांना दव बद्दल सावध केले आहे. (IND vs NZ 3rd T20I 2021: आपल्या आवडत्या ईडन गार्डन्स मैदानावर ‘हिटमॅन’ Rohit Sharma आपल्या नावे करू शकतो ‘हे’ दोन दमदार रेकॉर्ड)
गांगुलीने शुक्रवारी खेळपट्टीचे बारकाईने निरीक्षण केले आणि क्युरेटर सुजन मुखर्जी आणि CAB अध्यक्ष अविशेक दालमिया यांच्याशी बोलले. टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही संध्याकाळी 7.30 नंतर दव पडण्याची शक्यता आहे. याशिवाय या सामन्यात दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी विशेष प्रकारचा स्प्रे वापरण्यात येणार आहे. तिसर्या टी-20 सामन्यादरम्यान दव घटक खूप प्रभावी ठरू शकतो असे गांगुलीचे मत आहे. ईडन गार्डन्सवर पत्रकारांशी संवाद साधताना सौरव गांगुली म्हणाला, “ही सामन्यासाठी खूप चांगली खेळपट्टी आहे, जशी अनेकदा ईडन गार्डन्स वरील सामन्यासाठी दिली जाते. सामन्यादरम्यान दव मोठी भूमिका बजावू शकतो आणि आता काय होते ते पाहावे लागेल.”
उल्लेखनीय आहे की रोहित शर्मासाठी ईडन गार्डन्स हे मैदान अगदी खास आहे. याच मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक 264 वैयक्तिक धावा केल्या होत्या आणि कर्णधार म्हणून पहिली मालिका 3-0 च्या फरकाने जिंकणे त्याच्यासाठी सुवर्णमय ठसेल. तीन सामन्यांची मालिका यापूर्वीच टीम इंडियाच्या पदरी असल्यामुळे आजच्या सामन्यात काही बदल होण्याची शक्यता दिसत आहे. रुतुराज गायकवाड, आवेश खान, युजवेंद्र चहल आणि ईशान किशन यांना या सामन्यात कर्णधार संधी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.