IND vs NZ 2nd Test 2020 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

दोन्ही संघ दौऱ्याच्या अंतिम टेस्ट सामन्यासाठी क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात आमने-सामने येतील. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्ट होईल. सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

भारताचा (India) न्यूझीलंड (New Zealand) दौरा जवळपास संपुष्टात आला आहे. दोन्ही संघ दौऱ्याच्या अंतिम टेस्ट सामन्यासाठी क्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅगले ओव्हल (Hagley Oval) मैदानात आमने-सामने येतील. या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ (Indian Team) जोरदार पुनरागमन करत मालिकेत पुनरागमन मारत मालिकेत बरोबरी करू इच्छित असेल. शिवाय, त्यांच्यासमोर मालिकेत क्लीन स्वीप होण्याचेही संकट आहे. यापूर्वी न्यूझीलंडने भारताचा वनडे मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. म्हणजे भारतासमोर यंदाच्या दौऱ्यावर सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीपची टांकती तलवार आहे. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यास भारत मालिका गमवेले तर न्यूझीलंड संघ वनडेनंतर टेस्ट मालिकाही खिशात घालेल. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. (IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्चमध्ये टीम इंडियासमोर क्लीन स्वीपचे संकट, न्यूझीलंडला प्लेयिंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात 'हे' 3 बदल)

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टस्ट सामना शुक्रवार, 29 फेब्रुवारी रोजी क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी 4:00 वाजता सुरू होईल. सकाळी 3.30 वाजता नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्ट होईल. सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरी करण्यासाठी भारताला त्यांच्या फलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय खेळाडूंनी बॅटिंगने निराशा केली. गोलंदाजांना बचाव करण्यासाठी फलंदाजांना बॅटने मोठी धावसंख्या करण्याची गरज आहे. सलामी फलंदाज मयंक अग्रवालला वगळता अन्य कोणताही फलंदाज प्रभावी खेळ करू शकला नाही. दुसरीकडे, घरच्या मैदानावर खेळण्याचे किवी टीमला फायदा आहे. यजमान टीमला त्यांच्या गोलंदाजांकडून पहिल्या सामन्याप्रमाणेच खेळाची अपेक्षा असेल.

असा आहे भारत-न्यूझीलंड टेस्ट संघ

भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि उमेश यादव.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रैंडहोम, काईल जैमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, नील वैगनर, बीजे वॉटलिंग.