IND vs NZ 2nd Test 2024: दुसऱ्या कसोटीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन दुखापतीमुळे संघाबाहेर

आता तर तो पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचा भाग देखील नसणार आहे.

Kane Williamson (Photo Credit - X)

IND vs NZ 2nd Test 2024:  न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध (IND vs NZ) 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंड संघ 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध मैदानात उतरला नाही. आता तर तो पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचा भाग देखील नसणार आहे. केन विल्यमसनच्या कमरेला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. (IND vs NZ 2nd Test 2024: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर)

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी 22 ऑक्टोबर रोजी ही माहिती दिली की, केन विल्यमसन भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. याआधी केन विल्यमसन बंगळुरू कसोटीतही खेळला नव्हता कारण तो दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नव्हता. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान केन विल्यमसनला दुखापत झाली होती आणि त्यातून तो सावरत अद्याप सावरलेला नाही. केन सध्या त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.

तिसऱ्या कसोटीत पुनरागमन होऊ शकते

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी विल्यमसन तिसऱ्या कसोटीसाठी खेळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. केनची फिटनेस योग्य दिशेने वाटचाल करत आहे. परंतु अद्याप तो 100% तंदुरुस्त नाही. येत्या काही दिवसांत तो आणखी सुधारेल आणि तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

पहिली कसोटी 8 विकेटने जिंकून न्यूझीलंडने भारताची कसोटी विजयाची ३६ वर्षांची विजयाची प्रतिक्षा संपवली. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे.