Video: न्यूझीलंडमधील 'या' मुलाने केली जसप्रीत बुमराह च्या बॉलिंगची नक्कल, पाहून नक्की व्हाल अचंबित

भारताचे अनेक युवा गोलंदाज बुमराहप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत पण आता या खेळाडूची शैली सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे.

न्यूझीलंडमधील मुलाने केली जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगची नक्कल (Photo Credit: Twitter/OlliePringle63)

इंडियन प्रीमियर लीगद्वारे चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात गोलंदाजीच्या शैलीमुळे टीकेचा सामना करावा लागला. मात्र, श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगा सारखीच असलेली बुमराहची शैली त्याला अन्य गोलंदाजांपासून वेगळे करते. त्याच्या या शैलीबद्दल जोरदार टीका होत असतानाही बुमराहने ती कधीही बदलले नाही आणि याच्या जोरावर आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. आता बुमराहचा मर्यादित षटकांच्या स्वरूपात जगातील अव्वल गोलंदाजांमध्ये समावेश आहे. यामुळे युवा खेळाडू त्याच्या गोलंदाजीच्या शैली अनुसरण करत असतात. असाच न्यूझीलंड (New Zealand) मधील एक व्हिडिओ समोर आला आहे. भारताचे (India) अनेक युवा गोलंदाज बुमराहप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत पण आता या खेळाडूची शैली सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे.

तो लहान गोलंदाज बुमराहसारखाच रनअप घेताना दिसत आहे. हा मुलगा न्यूझीलंडचा असून यात एक लहान मुलगा बुमराहच्या बॉलिंगच्या शैलीचे अनुकरण करताना दिसत आहे, जे कौतुकास्पद आहे. बॉल टाकण्याच्या वेळी त्या मुलाच्या शैलीत स्फूर्ती दिसत आहे. पाहा हा व्हिडिओ:

दुखापतीमुळे बर्‍याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असलेला बुमराह सध्या न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे आणि दुखापतीतून पुनरागमन केल्यावर ही त्याची पहिली मालिका आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत बुमराहने 6 गडी बाद केले, तर हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये दुसरा वनडे सामना ऑकलँडमध्ये खेळला जात आहे. यात किवी संघाकडून मार्टिन गप्टिलने 79 आणि हेन्री निकोल्सने 41 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. अखेरीस रॉस टेलरने 73 धावा करून संघर्षपूर्ण फलंदाजी केली आणि संघाच्या संघर्षपूर्ण धावसंख्येचा महत्वपूर्ण भूमिका बजावली.