IND vs NZ 1st Test: विराट कोहली साठी घटक सिद्ध होऊ शकतात न्यूझीलंडचे 'हे' दोन स्टार गोलंदाज, सर्वाधिक वेळा केले आहे आऊट

या मालिकेत भारतीय फलंदाज आणि किवी गोलंदाजांमध्ये क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेषतः विराट कोहली आणि न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांमध्ये लढत पाहायला मिळेल.

विराट कोहली, न्यूझीलंड टीम (Photo Credit: Getty Images)

भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व (Basin Reserve) मैदानावर खेळला जाईल. मालिका जिंकून दोन्ही संघ आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप (ICC Test Championship) मध्ये आपली स्थिती मजबूत करू पाहत असेल. टीम इंडिया सध्या 360 गुणांसह अव्वल तर किवी टीम 60 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेत भारतीय फलंदाज आणि किवी गोलंदाजांमध्ये क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेषतः विराट कोहली (Virat Kohli) आणि न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांमध्ये लढत पाहायला मिळेल. आतापर्यंत खेळलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश आहे. तिन्ही स्वरूपात त्याची संख्या थक्क करणारी आहे. पण, किवी गोलंदाज टिम साऊथी (Tim Southee) आणि नील वॅग्नर (Neil Wagner) यांनी विराटला सर्वाधिक वेळा बाद केले आहे. (IND vs NZ 1st Test: सौरव गांगुली याला विराट कोहली टाकणार मागे, पहिल्या सामन्यात बनू शकतात 'हे' प्रमुख रेकॉर्डस्)

विराट आणि वॅग्नर टेस्ट क्रिकेटमध्ये 8 डावात आमने-सामने आले आहे. यामध्ये त्याने कॅप्टन विराटला सर्वाधिक 3 वेळा आऊट केले आहे. दुसरीकडे, साऊथी आणि कोहलीमधील लढत अंडर-19 च्या वेळेपासूनची आहे. साऊथी, न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांमधील महत्वाचा खेळाडू आहे. दोघे आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वेळा आमने-सामने आले ज्यातील 5 वेळा साऊथीने आऊट केले. विशेष म्हणजे, या पाचही वेळा साऊथीने विराटला कॅच आऊट केले आहे. या वेळीदेखील विराट, साउदी आणि वॅग्नरमधील बॅट आणि बॉलमध्ये एक रंजक लढाई होईल आणि कोण विजयी होईल हे आता वेळच सांगेल.

वॅग्नर टेस्ट विशेषज्ञ मानला जातो. आतापर्यंत त्याला न्यूझीलंडकडून वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो त्याच्या शानदार स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. जर वॅगनरला विकेट घेण्यासाठी मदत मिळाली तर ते जगातील आघाडीच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पडू शकतो. दरम्यान, यापूर्वी यजमान टीमवर पूर्णपणे वर्चस्व राखून भारताने टी-20 मालिका 5-0 ने जिंकली. पण, वनडे मालिकेत न्यूझीलंडने भारताचा व्हाईट वॉश करून विजय मिळवला.