IPL Auction 2025 Live

IND vs NZ 1st Test: एजाज पटेल च्या डायरेक्ट थ्रो ने रिषभ पंत झाला रनआऊट, अजिंक्य रहाणे वर Netizens ने केली टीका (Video)

पण, पंतच्या रनआऊट नंतर सामान्यच चित्रच बदलून गेलं. सोशल मीडिया यूजर्सचे हे लक्षात येताच त्यांनी रहाणेवर टीका करण्यास सुरुवात केली.

रिषभ पंत रनआऊट (Photo Credit: Twitter/ESPNcricinfo)

भारतीय संघाचा युवा विकेटकिपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) चा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी रिद्धिमान साहा च्या ऐवजी वेलिंग्टनमधील सामन्यासाठी भारताच्या (India) प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश केला गेला. या निर्णयावर शुक्रवारी सकाळी हर्षा भोगले यांनी ट्वीटद्वारे टीका केली. पहिल्या दिवशी भारताची 122/5 अशी स्थिती असताना पंत फलंदाजीसाठी आला. तेव्हा त्याला टीकाकारांची बोलती बंद करण्याची आणि संघातत निवडीसाठी योग्य सिद्ध करण्यासाठी मोठ्या खेळीची गरज होती आणि प्रक्रियेत त्याला भारताचा डावही सावरायचा होता. पण दुर्दैवी रनआऊटमुळे त्याची मोठी खेळी करण्याचे स्वप्न भंगले. बेसिन रिझर्व्ह येथे सुरु असलेल्या सामन्यात पंत आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) फलंदाजीद्वारे प्रभावी कामगिरी करत असताना सर्वकाही भारतासाठी चांगले असल्याचे दिसत होते. पण, पंतच्या रनआऊट नंतर सामान्यच चित्रच बदलून गेलं. (IND vs NZ 1st Test Day 2: टीम इंडिया 165 धावांवर ऑलआऊट, Lunch पर्यंत न्यूझीलंडने केल्या 17 धावा)

दुसर्‍या दिवसाच्या चौथ्या ओव्हरमध्ये रहाणेने वर्तुळाच्या आत एजाज पटेलकडे चेंडू टाकला आणि एक धाव घेण्यासाठी पल्ला. पटेल चेंडूकडे मंद गतीने पळाला त्यामुळे एक धाव घेण्यासाठी वेळ होती. रहाणे धावत राहिले, परंतु पंतने दुसर्‍या टोकाला संकोच करत होता. अखेरीस, संधी नसताना पंतने स्ट्राइकरच्या शेवटी धाव घेतली. या गोंधळात ऐजाजने केलेल्या थ्रोमुळे पंत धावबाद झाला. पटेलने केलेला थ्रो अचूक नसला तरीही त्याने स्टंप्सची बेल उडवली आणि पंतला धावबाद केले. सोशल मीडिया यूजर्सचे हे लक्षात येताच त्यांनी रहाणेवर टीका करण्यास सुरुवात केली. पाहा काय म्हणाले नेटकरी:

पंत होणे कठीण आहे

पंतचे दुर्दैव

अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीत पहिल्यांदा

आपली वेळ येईल

कठीण नशीब!

अखेर किवी टीमने पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव 165 धावांवर गुंडाळला. टीम साऊथीने चार विकेट्स घेतल्या. यापूर्वी आणि पंत बाद झाल्यावर रहाणेचे अर्धशतकही हुकले. साऊथीच्या गोलंदाजीवर चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगने त्याचा झेल घेतला. 138 चेंडूत 5 चौकारांसह अजिंक्य 46 धावा करून माघारी परतला.