IND vs NZ 1st Test Live Score Update: पहिल्या डावात न्यूझीलंड 259 धावांवर गारद, वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सात विकेट
तर भारती संघाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या. तर आर अश्विवनने 3 विकेट घेतल्या.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा आठ गडी खून पराभव केला होता. यासह न्यूझीलंडने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या आहेत.
न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले. मिचेल सँटनर 33 धावा करून बाद झाला. टॉम लॅथम 15 धावा करून बाहेर पडला. भारताकडून सुंदरने 7 आणि अश्विनने 3 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Most Wicket in Test: अश्विन अण्णाचा मोठा करिष्मा! कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत घेतली मोठी झेप, तर शेन वॉर्नचा विक्रमही काढला मोडीत)
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके