IND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान
भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी पाच विकेट्स पूर्ण करत इशांतने रविवारी विशाल टप्पा गाठला. इशांतने 11 व्या वेळी 5 विकेट घेतल्या आणि झहीर खानबरोबर कसोटीत सर्वाधिक पाच विकेट मिळवणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसर्या स्थानावर झेप घेतली.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand मधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. रविवारी पहिल्या डावात न्यूझीलंड संघ 348 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताविरुद्ध पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली. इशांत शर्माने (Ishant Sharma) सर्वाधिक 5 गडी बाद केले. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन (Wellington) मधील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी पाच विकेट्स पूर्ण करत इशांतने रविवारी विशाल टप्पा गाठला. इशांतने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो टीम इंडियामधील सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज का आहे. दुसर्या दिवशी इशांतने टॉम ब्लंडेल, टॉम लाथम आणि रॉस टेलर यांना बाद केले होते. रविवारी त्याने टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट यांना बाद केले आणि पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. इशांतने 11 व्या वेळी 5 विकेट घेतल्या आणि 348 धावांवर ऑलआऊट केले. असे केल्याने शर्माने झहीर खान (Zaheer Khan) बरोबर कसोटीत सर्वाधिक पाच विकेट मिळवणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे दुसर्या स्थानावर झेप घेतली. (IND vs NZ 1st Test Day 3: इशांत शर्मा ने केला कहर; Lunch पर्यंत न्यूझीलंड पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट, घेतली 183 धावांची आघाडी)
झहीरने 92 कसोटी सामन्यात, तर शर्माने 97 व्या कसोटीत सामन्यात ही कामगिरी केली. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सर्वाधिक 23 वेळा डावात पाच विकेट घेत या यादीत अव्वल स्थान मिळवले आहेत. शिवाय, भारतीय गोलंदाजांमध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा डावात 5 घेणारा गोलंदाज म्हणून त्याने भागवत चंद्रशेखर (Bhagwat Chandrasekhar) यांना मागे टाकले. शर्माने आता कारकिर्दीत 9 वेळा ही कामगिरी केली. या यादीत फक्त इशांतपुढे कपिल देव (12) आणि अनिल कुंबळे (10) यांचा समावेश आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक 89, रॉस टेलरने 44 ब्लेंडलने 30 आणि काईल जैमीसनने 44 धावा केल्या. जैमीसनने कॉलिन डी ग्रैंडहोमसह महत्वपूर्ण 71 धावांची भागीदारी केली आणि किवी टीमला 300 धावांच्या टप्प्यात महत्वाची भूमिकाबजावली. तिसऱ्या दिवशी ऑलआऊट होत न्यूझीलंडने भारतावर 183 धावांची आघाडी घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)