‘Mumbai Indians टीम इंडियापेक्षा चांगला टी-20 संघ’, Michael Vaughan यांच्या ट्विटवर Wasim Jaffer यांच्याकडून कडक प्रत्युत्तर, पहा ट्विट

वॉनने आपल्या ट्विटमध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्सला भारतीय संघापेक्षा चांगले म्हटले आहे. वॉनने ट्विट केले की, “मुंबई इंडियन्स हा भारतीय संघापेक्षा चांगला टी-20 संघ आहे.” वॉनच्या ट्विटवर माजी भारतीय ओपनर वसीम जाफरने कडक प्रतिक्रिया दिली ज्याने माजी इंग्लिश कर्णधाराची बोलतीच बंद झाली.

माइकल वॉन आणि वसीम जाफर (Photo Credit: Twitter, Instagram)

IND vs ENG T20I 2021: इंग्लंडचा (England) माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी खेळाच्या विविध बाबींवर खूपच बोलका असल्याचे ओळखले जाते आणि नियमित अंतराने सामन्याबाबत ट्वीट करत असतात. दुसरीकडे जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडने 5 फेब्रुवारी रोजी भारत (India) दौर्‍यास सुरुवात केली तेव्हापासून वॉन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप सक्रिय दिसत आहेत. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान वॉनने भारतीय खेळपट्ट्यांवर कायम टीका करण्यात व्यस्त होते तर शुक्रवारी इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या सलामीच्या सामन्यात संघाच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटूने पुन्हा एकदा टीम इंडियाला (Team India) ट्रोल केले. वॉनने आपल्या ट्विटमध्ये आयपीएलच्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) भारतीय संघापेक्षा चांगले म्हटले आहे. वॉनने ट्विट केले की, “मुंबई इंडियन्स हा भारतीय संघापेक्षा चांगला टी-20 संघ आहे.” वॉनच्या ट्विटवर माजी भारतीय ओपनर वसीम जाफरने (Wasim Jaffer) कडक प्रतिक्रिया दिली ज्याने माजी इंग्लिश कर्णधाराची बोलतीच बंद झाली. (IND vs ENG T20I 2021: पराभवा नंतरही नाही बदलणार भारतीय फलंदाजांची निर्भय शैली, इंग्लंडविरुद्ध रणनीतीचा श्रेयस अय्यरने केला खुलासा)

जाफरने व्हॉनच्या ट्विटला उत्तर म्हणून लिहिले की, “सर्व संघ 4 परदेशी खेळाडू खेळवण्या इतके भाग्यवान नसतात.” जाफर यांनी टी-20 साम्ण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड खेळाडूंवर निशाणा साधला. सध्याच्या इंग्लंड संघात असे बरेच खेळाडू आहेत जे मूळचे इंग्लिश नाहीत. इंग्लंड टी-20 संघाचा कर्णधार इयन मॉर्गन (आयर्लंड), बेन स्टोक्स (न्यूझीलंड), आदिल रशीद (पाकिस्तान) आणि जोफ्रा आर्चर (वेस्ट इंडीज) दुसऱ्या देशातून येत इंग्लंडकडून खेळत आहेत. सध्या केएल राहुलच्या पंजाब किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या जाफरने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. यावेळीही माजी भारतीय क्रिकेटपटूने उत्तर देऊन वॅनला चकित केले. वॉनबद्दल बोलायचे तर त्यांनी दावा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-20 दरम्यान केला होता. हा सामना एकतर्फी ठरला कारण नाणेफेकपासून कोहली आणि संघाच्या हाती काहीही आले नाही.

प्रत्युत्तरात जेसन रॉयच्या 49 आणि जोस बटलर, डेविड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांच्या योगदानामुळे इंग्लंडने 8 विकेट आणि 27 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. रविवार, 14 मार्च रोजी त्याच मैदानावर पुढील सामना होणार असून इंग्लंडकडे 1-0 अशी आघाडी आहे.