IND vs ENG T20I 2021: मिस्ट्री स्पिनर Varun Chakravarthy याच्या डेब्यूमध्ये पुन्हा अडचणी, इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची ओढवली नामुष्की
भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे कारण लेग-स्पिनर बीसीसीआयला फिटनेस टेस्टमध्ये प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. Cricbuzzच्या अहवालानुसार त्याने टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली नाही, ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध राष्ट्रीय संघातील त्याचे स्थान धोक्यात पडले आहे.
IND vs ENG T20I 2021: भारताचा (India) मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचे (Varun Chakravarthy) आंतरराष्ट्रीय पदार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे कारण लेग-स्पिनर बीसीसीआयला (BCCi 0फिटनेस टेस्टमध्ये प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. Cricbuzzच्या अहवालानुसार त्याने टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली नाही, ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध (England) राष्ट्रीय संघातील त्याचे स्थान धोक्यात पडले आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार एखाद्या खेळाडूला एकतर 2 किमीची धावण्याची फिटनेस टेस्ट पास करावी लागेल किंवा यो-यो टेस्टमध्ये 17.1 गुण मिळवावे लागतील. अलीकडे एनसीएमध्ये (NCA) ईशान किशन, संजू सॅमसन, जयदेव उनाकदत, सिद्धार्थ कौल आणि इतरांची टेस्ट झाली त्यानंतर किशनची इंग्लंड टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली. बीसीसीआयने अधिकृत अद्ययावत माहिती न दिल्याने चक्रवर्ती अद्याप संघात कायम आहेत. सध्याचे संघ व्यवस्थापन फिटनेसकडे अधिक लक्ष देते आणि खेळाडूंना टेस्ट क्लिअर करणे अनिवार्य आहे. (IND vs ENG Series 2021: टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंडसाठी धोक्याची घंटा; विजय हजारे ट्रॉफीमध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी)
2017/18 मध्ये बीसीसीआयने अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, सुरेश रैना आणि युवराज सिंह यांना बीसीसीआयच्या टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने संघातून वगळले होते. यानंतर रायुडू, रैना आणि शमीने यो-यो चाचणी उत्तीर्ण होताच त्यांचे राष्ट्रीय पुनरागमन केले होते. जर चक्रवर्तीने आपले स्थान गमावले तर ते फिरकीपटूसाठी मोठा धक्का ठरेल.2020 मध्ये चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली होती मात्र खांद्याच्या अडचणीमुळे त्याला मालिकेला मुकावे लागले. नोव्हेंबरपासून कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट न खेळताही चक्रवर्तीला इंग्लंड टी-20 मालिकेसाठी रिटेन केले गेले. 1 मार्च रोजी व्हाइट बॉलच्या खेळाडूंना अहमदाबादला पोहोचण्यास सांगितले असल्याने त्याच्याबद्दल लवकरच स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका 12, 14, 16, 18 आणि 20 मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या जाणार आहेत. यानंतर हे दोन्ही संघ 3 एकदिवसीय सामन्यांसाठी पुण्याला रवाना होतील. 23, 26 आणि 28 मार्च रोजी एकदिवसीय सामने आयोजित केले जाणार आहेत. सध्या दोन्ही संघात चार सामन्यांची टेस्ट सिरीज खेळली जात असून टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यानंतर रेड-बॉल क्रिकेट संपुष्टात येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)