IND vs ENG Series 2021: पहिल्या दोन कसोटीसाठी ब्रिटिश संघात स्टोक्ससह 4 खेळाडूंचे पुनरागमन, निलंबित केलेल्या ‘या’ गोलंदाजाचे कमबॅक
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बुधवारी भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या होम टेस्ट सीरिजसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. संघाच्या नेतृत्वाची धुरा जो रुट याच्याकडे आहे, तर बेन स्टोक्स समवेत जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन यांचे संघात पुनरागमन झाले आहेत तर जून महिन्यात निलंबित करण्यात आलेल्या ओली रॉबिन्सनला संघात स्थान देण्यात आले आहे.
IND vs ENG Test 2021 Squad: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) बुधवारी भारताविरुद्ध (India) 5 सामन्यांच्या होम टेस्ट सीरिजसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. संघाच्या नेतृत्वाची धुरा जो रुट (Joe Root) याच्याकडे आहे, तर बेन स्टोक्स (Ben Stokes) समवेत जोस बटलर, जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), सॅम कुरन यांचे संघात पुनरागमन झाले आहेत तर सिल्व्हरवुड पुन्हा एकदा संघात प्रशिक्षक म्हणून सामील होतील. उल्लेखनीय आहे की पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान नॉटिंघॅममध्ये होईल. यानंतर दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल. तिसरी टेस्ट मॅच 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान लीड्स आणि चौथी टेस्ट मॅच 2 येते 6 सप्टेंबर दरम्यान लंडनच्या ओवल मैदानात होईल. मालिकेचा अखेरचा सामना 10 सप्टेंबर रोजी मॅन्चेस्टरमध्ये होणार आहे. (IND vs ENG Series 2021: इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाकडे आहे ‘हे’ 4 ओपनिंग कॉम्बिनेशन, पण अखेर कोणाची लागणार वर्णी)
इंग्लंडच्या कसोटी संघाबद्दल बोलायचे तर पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) स्थान मिळाले नसून जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलेला आणि त्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या ओली रॉबिन्सनला (Ollie Robinson) संघात स्थान देण्यात आले आहे. रॉबिन्सन 7-8 वर्षापूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या आपत्तीजनक पोस्टमुळे इंग्लंड बोर्डाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले होते मात्र गेल्या महिन्यात चौकशीनंतर त्याच्या आठ सामन्यांची बंदी आणि दंड ठोठावल्यावर त्याला राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास परवानगी देण्यात अली होती. ओलीने 2012 ते 2014 या काळात लिंगभेद आणि वर्णद्वेषी ट्विट केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने व्हिडिओद्वारे संबंधित ट्विटबद्दल माफी मागितली होती. शिवाय, हसीब हमीदला पुन्हा एकदा फलंदाजीचा पर्याय म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच यंदा महिन्याच्या सुरुवातीला सरे संघासाठी फलंदाजी करताना मांडीला दुखापत झाली असतानाही ओली पोपचा समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड क्रिकेट टीम: जो रूट (कॅप्टन), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रोली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ऑली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स आणि मार्क वूड.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)