IPL Auction 2025 Live

IND vs ENG 5th T20I 2021: भारत-इंग्लंड पाचवा टी-20 सामना ठरणार खास; रोहित, राहुलसह खेळाडू करू शकतात ‘हे’ मोठे रेकॉर्ड

सध्या दोन्ही संघातील मलिका 2-2 अशा बरोबरीत असल्याने आजचा सामना निर्णायक असणार आहे. तसेच या सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना काही विक्रम करण्याची संधी आहे ज्याच्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत.

रोहित शर्मा आणि डेविड मलान (Photo Credit: PTI)

IND vs ENG 5th T20I 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा सामना आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सध्या दोन्ही संघातील मलिका 2-2 अशा बरोबरीत असल्याने आजचा सामना निर्णायक असणार आहे. विराट कोहली आणि संघ टी-20 मालिका काबीज करत द्विपक्षीय मालिकेतील आपली घोडदौड ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता. दुसरीकडे, इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) कसोटी मालिका गमावल्यानंतर मर्यादित ओव्हरची मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. वर्ल्ड टी-20 कपपूर्वी इंग्लंडचा हा अखेरचा टी-20 सामना असल्याने विजय त्यांच्या उत्साहात वाढ करेल. तसेच या सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना काही विक्रम करण्याची संधी आहे ज्याच्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 5th T20I 2021: Michael Vaughan ने KL Rahul याच्या जागी पाचव्या टी-20 मध्ये सलामीसाठी ‘या’ खेळाडूवर लावला दाव)

1. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन भारताविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकणारा पहिला इंग्लिश कर्णधार बनू शकतो. यापूर्वी दोन टी-20 द्विपक्षीय मालिकेत त्यांना दोनदा 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता.

2. मॉर्गन टी -20 मध्ये तिसऱ्या सर्वाधिक धावा करण्यापासून 37 धावा दूर आहे. तो मोहम्मद हाफिज, शोएब मलिक आणि आरोन फिंचला मागे टाकू शकतो. इंग्लंड कर्णधाराने 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2310 धावा केल्या आहेत.

3. भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यापासून अवघ्या 40 धावा दूर आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नंतर 2,839 धावांसह तो तिसर्‍या स्थानावर आहे. रोहितने 110 सामन्यात 2800 धावा केल्या आहेत.

4. केएल राहुलने जर या सामन्यात 59 किंवा अधिक धावा केल्यास तो सुरेश रैनाला मागे टाकत भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरेल. त्याने सध्या 49 सामन्यात 1557 धावा केल्या आहेत.

5. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डेविड मालनला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद  1000 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 65 धावांची आवश्यकता आहे.

6. पाचव्या टी-20 मध्ये टी-20 मध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा युजवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळाल्यास तो अनेक विक्रम मोडू शकतो. चहल इम्रान ताहिर (63), डेल स्टेन (64) आणि स्टुअर्ट ब्रॉड (65), नुवान कुलसेकरा आणि बी मेंडिस (प्रत्येकी 66) यांना पाच विकेट्ससह मागे टाकू शकतो.

7. राहुलला जर या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर हा त्याचा 50वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताचा 9वा क्रिकेटपटू ठरेल.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी-20 सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे. 2-2 ने बरोबरीवर असलेल्या टी-20 मालिकेचा शेवटचा निकाल या सामन्यावर अवलंबून असेल, त्यामुळे दोन्ही संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरतील. सलग चार अपयशानंतर राहुलला संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.