IND vs ENG 4th Test: विराट कोहलीच्या कमजोरीचा Ben Stokes याने घेतला फायदा; ‘शून्यावर’ बाद होताच किंग कोहलीने केली MS Dhoni याच्या नकोशा रेकॉर्डची बरोबरी
दिवसाच्या पहिल्या सत्रात चेतेशवर पुजारा बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्सने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. चौथ्या क्रमांकावर फंलदाजीला आलेला कोहली भोपळाही न फोडता पव्हेलियनला परतला. स्टोक्सने भारतीय कर्णधाराला 8 चेंडू शून्य धावेवर विकेटच्या मागे झेलबाद केले.
IND vs ENG 4th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील मालिकेचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तम गोलंदाजीनंतरभारतीय फलंदाज बॅकफूटवर दिसत आहेत. दिवसाच्या पहिल्या सत्रात चेतेशवर पुजारा बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. चौथ्या क्रमांकावर फंलदाजीला आलेला कोहली भोपळाही न फोडता पव्हेलियनला परतला. स्टोक्सने भारतीय कर्णधाराला 8 चेंडू शून्य धावेवर विकेटच्या मागे झेलबाद केले. इतकंच नाही तर स्टोक्सने कोहलीच्या कमजोरीचा फायदा घेतला आणि आउट साइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून त्याची अंतिम टेस्ट घेतली. ज्याच्यापुढे कोहली अडकला आणि मालिकेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर आऊट झाला. विशेष म्हणजे, स्टोक्सने मालिकेत दोनदा कोहलीला बाद केले. (IND vs ENG 4th Test Day 2: टीम इंडियाची घसरगुंडी, दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारत 4 बाद 80 धावा)
चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भोपळा न फोडता माघारी परताच विराटने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. कोहली भारतीय कर्णधार म्हणून शून्यावर बाद होण्याची ही 8वी वेळ ठरली. भारताच्या कर्णधारांद्वारे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या रेकॉर्डची नोंद या दोन कर्णधारांच्या नावावर झाली आहे. शिवाय, कोहली कारकिर्दीतील केवळ दुसऱ्यांदा एकाच कसोटी मालिकेत दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी, 2014 इंग्लंड दौऱ्यावर लियम प्लंकेट व जेम्स अँडरसनने त्याला शून्यावर माघारी पाठवले होते आणि यंदा मोईन अली आणि स्टोक्सने विराटला भोपळा फोडू दिला नाही. तसेच, स्टोक्सने कोहलीला 5 वेळा बाद केले, जे त्याच्यासाठी कसोटी क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाविरूद्ध सर्वात जास्त आहे. यापूर्वी, स्टोक्सने माजी कसोटी क्रिकेटपटू मिचेल क्लार्क आणि डीन एल्गारला 4 वेळा बाद केले आहे.
What a way to start my Weekend looks like the Emperor is breaking down 😂😂😂😂 don't mess with Ben Stokes Kohli 🤣🤣🤣#INDvENG pic.twitter.com/tW5ND4ZSfw
— #bigSmile (@tapslua) March 5, 2021
दरम्यान, यापूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टोक्स आणि विराटमध्ये काही कारणास्तव शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे तर दिवसाच्या पहिल्या सत्रात 4 बाद 80 धावा केल्या आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2021 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

