IPL Auction 2025 Live

IND vs ENG 3rd Test: Rishabh Pant याने 'नवीन मित्र स्पायडी'सह केला टीम इंडियाच्या नेट सेशनचा दौरा, पहा मजेदार व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर व्हायरल 'स्पायडरमॅन, स्पायडरमॅन' गाणे गाण्यापासून, जिम सत्रात 'स्पायडरमॅन'ची नक्कल करण्यापर्यंत, 23-वर्षीय पंतचेकाल्पनिक सुपरहीरोबद्दल प्रेम निश्चित वाढतच आहे. आता पंतला एक नवीन मित्र सापडला आहे आणि त्याने त्याला 'स्पायडी' असे नाव दिले आहे.

रिषभ पंतची नवीन मित्र स्पायडीसह मस्ती (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतला (Rishabh Pant) नक्कीच 'स्पायडर मॅन' आवडतो. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर व्हायरल 'स्पायडरमॅन, स्पायडरमॅन' गाणे गाण्यापासून, जिम सत्रात 'स्पायडरमॅन'ची नक्कल करण्यापर्यंत, 23-वर्षीय पंतचेकाल्पनिक सुपरहीरोबद्दल प्रेम निश्चित वाढतच आहे. आता पंतला एक नवीन मित्र सापडला आहे आणि त्याने त्याला 'स्पायडी' (Spidey) असे नाव दिले आहे. आपल्या अखेरच्या चार कसोटींमध्ये प्रत्येकी अर्धशतक झळकावणाऱ्या या स्टार फलंदाजाने टीम इंडियाच्या (Team India) नेट सत्रादरम्यान आपल्या मित्राची ओळख करुन दिली. स्वतः पंतनंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने पंत आणि त्यांचा नवीन मित्र 'स्पायडी'चा मजेदार व्हिडिओ शेअर केला. "चमकदार कॅच आणि स्टंपिंग्ज करतो, सहजतेने मोठे षटकार ठोकतो. रिषभ पंत आता ड्रोन कॅमेर्‍याने थोडी मस्ती करतो," असं कॅप्शन देत बीसीसीआयने (BCCI) पंतचा मजेदार व्हिडिओ शेअर केला. (India's Probable Playing XI for 3rd Test: Pink-Ball टेस्टसाठी असा असू शकतो टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन, ‘या’ खेळाडूंना संधीची शक्यता)

व्हिडिओमध्ये पंत ड्रोनसह टीम इंडियाचे नेट सेशन रेकॉर्ड करताना दिसत आहे. अश्विन आणि इतर खेळाडूंसोबत पंत ड्रोन कॅमेर्‍याने काही मजा करताना दिसत आहे. अलीकडे, बीसीसीआयने मोटेरा स्टेडियमचे एक हवाई फुटेज पोस्ट केले होते, ज्याने सोशल मीडियावर यूजर्सचे बरेच लक्ष वेधले होते. पंतच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप पसंत पडत आहे, त्याचबरोबर त्यावर बरेच कमेंट्सही केली जात आहेत. पहा हा मजेदार व्हिडिओ:

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर तिसरा कसोटी सामन्याचे काऊंटडाऊन सुरु झाले असून दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यात दोन्हीपैकी एका संघाचा पराभव झाल्यास त्यांची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता संपुष्टात येईल. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दुसर्‍या सामन्यात ज्याप्रकारे कामगिरी केली त्याप्रमाणे प्रभावी खेळीची भारताकडून अपेक्षित असेल. चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पंतने विकेटच्या मागे काही जबरदस्त कामगिरी केली आणि काही चांगले झेल पकडले होते. त्याने पहिल्या डावात नाबाद 58 धावांची खेळी करत शानदार प्रदर्शन केले होते.