IND vs ENG 3rd T20I 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा टी-20 सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर

दोन्ही संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा बरोबरीत असून आता सिरीज अजून रंजक बनली आहे. सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. शिवाय, Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

बेन स्टोक्स आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd T20I 2021 Live Streaming: अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा बरोबरीत असून आता सिरीज अजून रंजक बनली आहे. दोन्ही संघात मालिकेत कोण बाजी मारेल याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) बाजी मारली. आता भारत आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल तर 6:30 वाजता टॉस होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. शिवाय, Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स 5 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि तामिळ) सामना लाईव्ह प्रसारित करणार आहे. (India vs England T20I Series 2021: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरचे 3 टी-20 सामने प्रेक्षकांविना; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनचा निर्णय)

दरम्यान, राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनने उर्वरित टी-20 सामन्यात प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले आहे. पहिल्या टी -20 मध्ये एकूण 67,532 प्रेक्षक सामना पाहण्यासं उपस्थित होते तर दुसर्‍या टी-20 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 66,000 न अधिक जण जमा झाले होते. गेल्या 24 तासांत भारतात 25,320 नवीन कोविड-19 आणि 16,637 रिकव्हरीची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. दुसरीकडे, भारतीय संघ सामन्यात आपली विजयी लय कायम ठेवू पाहत असेल तर इंग्लिश संघ सामन्यात कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

असा आहे भारत-इंग्लड टी-20 संघ

भारताचा टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया आणि ईशान किशन (राखीव विकेटकीपर).

इंग्लंड टी-20 संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर, जेसन रॉय, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरन, टॉम कुरन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.