IND vs ENG 2nd T20I 2021: अंपायरशी मतभेदावर Virat Kohli याने स्टम्पवर काढली भडास, इंग्लंडला झाला फायदा, नक्की काय घडले पहा
तथापि, भारतासाठी लक्ष्य आणखी लहान असू शकले असते परंतु टीम इंडियाच्या गचाळ फिल्डिंगमुळे इंग्लिश संघाने अधिक धावा लुटल्या. या सामन्यात वाईट क्षेत्ररक्षकांच्या यादीत कर्णधार विराट कोहलीचेही नाव आहे.
IND vs ENG 2nd T20I 2021: अहमदाबाद (Ahmedabad) येथे खेळल्या जाणार्या दुसर्या टी -20 सामन्यात इंग्लंडने (England) भारताला (India) सामना विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले आहे. तथापि, भारतासाठी लक्ष्य आणखी लहान असू शकले असते परंतु टीम इंडियाच्या (Team India) गचाळ फिल्डिंगमुळे इंग्लिश संघाने अधिक धावा लुटल्या. या सामन्यात वाईट क्षेत्ररक्षकांच्या यादीत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचेही नाव आहे, ज्याने मैदानात उत्सुकता दाखवण्याच्या नादात आपल्यावरचा ताबाच गमावला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि जेसन रॉय (Jason Roy) फलंदाजी करत असताना ही घटना घडली. बेअरस्टोने 30 यार्ड सर्कलच्या आत शॉट खेळत आणि एक चोरटी धाव घेतली. परंतु जेव्हा क्षेत्ररक्षक नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने चेंडू फेकला तेव्हा बेअरस्टो क्रीजच्या आत उभा असूनही विराटने बेल्स उडवल्या आणि चेंडू स्टंपला लागून दूर गेला. परिणामी इंग्लंडला एक धाव फुकटात मिळाली. (IND vs ENG 2nd T20I 2021: कोहलीचा ‘विराट’ कारनामा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला पहिला भारतीय तर जगातील तिसरा कर्णधार)
दर्म्य, युजवेंद्र चहलच्या 9व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूला अंपायरने वाईड दिला. रॉयने ऑफसाइडच्या दिशेने चेंडू खेळला असला तरी पंचांनी त्या चेंडूला वाइड म्हटले. या निर्णयावर नाराज कोहलीने हार्दिक पंड्याने फेकलेल्या पुढच्याच ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर आपली भडास काढली ज्याचा फायदा इंग्लडला झाला आणि त्यांना एक फुकट धाव मिळाली. दरम्यान, टॉस जिंकून इंग्लीसह संघाला पहिले फलंदाजी करायला सांगत भारताने इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 6 बाद 164 धावांवर रोखले. जेसन रॉयचे अर्धशतक अवघ्या काही धावांनी हुकले आणि इंग्लिश ओपनर 35 चेंडूत 46 धावाच करू शकला.
विराट कोहली वाईड बॉलवर
शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक इंग्लिश फलंदाजांना पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. नरेंद्र मोदी स्टेडियमवर यापूर्वी यजमान भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोहली म्हणाला की, सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी अनुक्रमे इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.