IND vs ENG 2nd T20I 2021: टीम इंडियाची शानदार गोलंदाजी, इंग्लंडने विजयासाठी दिले 165 धावांचे लक्ष्य

इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 46 धावा केल्या. कर्णधार इयन मॉर्गनने 28 धावा तर डेविड मलानने 24 धावांचे योगदान दिले.

भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड (England) संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 धावा केल्या आणि यजमान भारतीय संघाला (Indian Team) विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडकडून जेसन रॉयने (Jason Roy) सर्वाधिक 46 धावा केल्या. कर्णधार इयन मॉर्गनने 28 धावा तर डेविड मलानने 24 धावांचे योगदान दिले. शिवाय, अष्टपैलू बेन स्टोक्स धावा आणि सॅम कुरन धावा करून नाबाद परतले. टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता पण गचाळ फिल्डिंगमुळे आणि विरोधी संघाने मोठी धावसंख्या गाठल्याने चुकीचा सिद्ध झाल्याचे दिसत आहे. टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर भूवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. भारताकडून आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. (IND vs ENG 2nd T20I 2021: खूप हुशार चाल! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन फलंदाजांच्या डेब्यूवर Michael Vaughan यांचे गमतीशीर ट्विट)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाची सुरुवात झाली नाही आणि एका धावेवर भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यानंतर, रॉय आणि मलानने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. इंग्लंडने पॉवर-प्ले ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 44 धावा केल्या. यानंतर, भुवीने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आणि रॉयला 46 धावांवर वॉशिंग्टन सुंदरच्या हाती कॅच आऊट केलं. वॉशिंग्टन सुंदरने जॉनी बेयरस्टोला सूर्यकुमारच्या हाती कॅच आऊट करत संघाला चौथे यश मिळवून दिले. बेयरस्टोवने 20 धावा केल्या. शार्दुलने इंग्लंडला पाचवा धक्का देत कर्णधार मॉर्गनला 28 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. अष्टपैलू बेन स्टोक्सने एका चौकारच्या मदतीने 21 चेंडूत 24 धावा केल्या तर सॅम कुरनने पाच चेंडूत एका चौकारच्या मदतीने नाबाद 6 धावांची खेळी केली.

दरम्यान, याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने यजमान संघाचा 8 विकेट्सने पराभव केला होता. भारताने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले होते जे मॉर्गनच्या इंग्लिश संघाने 2 विकेट्स गमावून गाठले आणि 5 सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली.