IND vs ENG 2nd ODI 2021: सूर्यकुमार यादवला वनडे पदार्पणाची संधी, टीम इंडियामध्ये दुसऱ्या सामन्यासाठी होऊ शकतात 3 बदल, पहा संभावित Playing XI

तथापि, आता बेंचवरील खेळाडूंकडे आता प्रभाव पाडण्याची ही मोठी संधी असेल. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे आगामी सामन्यात ते मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. या सामन्यात संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करू शकते.

दीपक चाहर, विराट कोहली आणि टी नटराजन (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) दणक्यात पुनरागमन करत 66 धावांनी दमदार विजय मिळवला. पहिल्या सामन्यातील विजय आत्मविश्वास वाढवणारा होता परंतु श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना दुखापत झाली. तथापि, आता बेंचवरील खेळाडूंकडे आता प्रभाव पाडण्याची ही मोठी संधी असेल. श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) दुखापत केवळ आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठीच नाही तर टीम इंडियासाठीदेखील एक जोरदार धक्का आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर दोन्ही संघ दुसऱ्या वनडे सामन्यासाठी आमने-सामने येतील. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे आगामी सामन्यात ते मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. या सामन्यात संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करू शकते ज्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 2nd ODI 2021: दुसर्‍या वनडे सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा झटका, कर्णधार इयन मॉर्गन आणि ‘या’ फलंदाजाच्या खेळण्यावर साशंकता)

सलामी जोडी: रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाल्याने संघ दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देऊ शकते. अशास्थितीत, ‘हिटमॅन’च्या जागी केएल राहुल आणि शिखर धवनची जोडी सलामीला उतरू शकते. यापूर्वी पहिल्या टी-20 सामन्यात देखील दोघे सलामीला आले होते, मात्र तेव्हा त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.

मध्य-क्रम: कर्णधार विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे संघात तो तिसऱ्या स्थानी फलंदाजी करेल. विराटनंतर टी-20 सामन्यात जबरदस्त अर्धशतकी खेळी केलेल्या सूर्यकुमार यादवचे वनडे पदार्पण होऊ शकते. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमारचा समावेश जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, राहुल सलामीला उतरल्याने त्याच्या जागी चौथ्या स्थानावर रिषभ पंतला संधी मिळू शकते. कसोटी आणि टी-20 मालिकेत पंतने चमकदार कामगिरी केली ज्यामुळे वनडे संघात त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.

अष्टपैलू: पांड्या बंधू-कृणाल आणि हार्दिक संघात अष्टपैलूची भूमिका बजावतील. मात्र, हार्दिक पूर्णपणे गोलंदाजी करण्यास सक्षम नसल्याने त्याचा अद्यापही फलंदाज म्हणून समावेश केला जात आहे. कृणालने आपल्या वनडे पदार्पणाच्या सामन्यात विक्रमी अर्धशतक केले होते त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात देखील त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले जाईल तर हार्दिकला अद्याप सूर गवसला नाही आहे.

गोलंदाज: टीम इंडियाच्या गोलंदाजी क्रमात एक बदल होताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लिश फलंदाजांनी कुलदीप यादवच्या 9 ओव्हरमध्ये 68 धावा लुटल्या. त्यामुळे, कुलदीपच्या जागी युजवेंद्र चहल स्थान मिळवू शकतो. विकेट्स मिळत नसल्यामुळे फिरकीपटू सध्या संघर्ष करत आहे आणि आत्मविश्वास परत मिळवल्याशिवाय त्याला एकदिवसीय सामन्यात कोहलीचा पाठिंबा मिळणे कठीण दिसत आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर हे भारताच्या वेगवान हल्ल्याचे नेतृत्व करतील. प्रसिद्ध कृष्णा संघाला तिसरा वेगवान गोलंदाज असेल. तो महागडा ठरला असला तरी विकेट्समुळे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात त्याला स्थान टिकवून ठेवता येईल.

पहा भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.



संबंधित बातम्या