IND vs ENG 2021: इंग्लंडमध्ये टीम इंडियाची फलंदाजी अप्रभावी पण Sunil Gavaskar म्हणतात 'कसोटी मालिकेची चिंता करू नका', जाणून घ्या कारण
माजी भारतीय फलंदाजाच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडमधील परिस्थितीबद्दल भारतीय संघाला चिंता करण्याची गरज नाही.
IND vs ENG 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला (Indian Team) 2021 इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) चांगली कामगिरी बजावण्यासाठी भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. माजी भारतीय फलंदाजाच्या म्हणण्यानुसार, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे भारतीय फलंदाज नवीन बॉलच्या परिणामाचा प्रतिकार करू शकतात, जे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या हातात असतील. गावस्कर यांनी लक्ष वेधले की इंग्लंडमधील (England) परिस्थितीबद्दल भारतीय संघाला चिंता करण्याची गरज नाही कारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मालिका सुरू होईपर्यंत उन्हाळा सुरु होईल. टीम इंडिया (Team India) इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला जोर की झटका, Ishant Sharma याच्या बोटाला घातले टाके)
“ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध मालिकेविषयी भारतीय फलंदाजांना चिंता करण्याची गरज नाही कारण तोपर्यंत उन्हाळा सुरु होईल आणि खेळपट्टी सुकून जातील. तसेच जिमी अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉडला पहिल्यांदा विकेट न मिळाल्यास, ते त्यांच्या पुढील स्पेलमध्ये संघर्ष करतात,” गावस्कर यांनी त्यांच्या The Telegraph कॉलममध्ये लिहिले. ब्रॉड आणि अँडरसन या मालिकेच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीत, हे जाणून भारतीय फलंदाजांना आनंद होईल. जूनच्या सुरूवातीला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या फलंदाजीविरुद्ध देखील दोन्ही वेगवान गोलंदाज संघर्ष करताना दिसले. माजी फलंदाजांनी पुढे नमूद केले की जर भारतीय फलंदाजांनी अँडरसन आणि ब्रॉडला नवीन बॉलसह विकेट घेण्यास परवानगी दिली नाही तर या दोघांनाही पुढच्या स्पेलने विकेट्स मिळवण्यास संघर्ष करावा लागेल.
दुसरीकडे, खेळाडूंसोबत चाहत्यांचे देखील लक्ष या दौऱ्याकडे असेल कारण 2007 पासून इंग्लंडमधील भारताची कामगिरी अत्यंत खराब झाली होती, परंतु यावेळी भारतीय संघ त्यात सुधारणा करण्यासाठी उत्साहित असेल. 2011 मध्ये भारताने 4-0 अशी मालिका गमावली तर 2014 मध्ये त्यांचा 3-1 असा पराभव झाला आणि अखेरीस 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता. या सर्व मालिकांमध्ये अँडरसन आणि ब्रॉड हे भारतीय फलंदाजांवर चेंडूने हल्ला चढवला होता.