IND vs ENG 1st Test Day 2 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिली टेस्ट कधी-कुठे कसे पाहता येणार? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast बद्दल सर्वकाही
पहिल्या दिवसाखेर डोम सिब्ली आणि रूट यांच्या द्विशतकी भागीदारीने संघाला मजबूत स्थतीत मिळवून दिली आहे. भारतीय प्रेक्षक दुसऱ्या दिवसाचा खेळ स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल.
IND vs ENG 1st Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) चेन्नईतील (Chennai) पहिल्या टेस्ट सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाईल. पहिल्या दिवसाखेर डोम सिब्ली आणि कर्णधार जो रूट (Joe Root) यांच्या द्विशतकी भागीदारीने संघाला मजबूत स्थतीत मिळवून दिली आहे. टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांचे शानदार कमबॅक, मात्र इंग्लंडने दिवसखेर 89.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 263 धावा केल्या आहेत. ज्यात कर्णधार रुटने शानदार कामगिरी केली तर सिब्लीने 87 धावांची खेळी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रुट 128 धावांवर नाबाद होता. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहला 2 तर रवीचंद्रन अश्विनला 1 विकेट मिळाली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:20 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 1st Test 2021: विराट कोहलीने पहिल्या दिवशी आपल्या या जेस्चरने जिंकली चाहत्यांची मनं, तुम्हीही कराल सलाम)
इंग्लंड कर्णधार जो रूटचा शानदार फॉर्म भारताविरुद्ध कायम आहे. श्रीलंकाविरुद्ध सलग दोन शतकी खेळीनंतर इंग्लंडच्या कॅप्टनने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि सलग तिसरे शतक ठोकले. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20वे शतक ठरलं. इंग्लंड संघ अडचणीत असताना निर्णायक क्षणी त्याने सिब्लीसह महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लिश कर्णधार द्विशतकी धावसंख्या गाठण्याच्या प्रयत्नात असेल तर टीम इंडिया गोलंदाजांपुढे त्याला रोखण्याचे आव्हान असेल. अद्याप बुमराह आणि अश्विनव्यतिरिक्त अन्य गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी झाले असल्याने सध्या त्यांच्यावर उत्तम कामगिरी करण्याचा दबाव असेल.
असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत,वॉशिंगटन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.
इंग्लंड: जो रुट (कॅप्टन), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच.