IND vs ENG 1st Test 2021: पहिला टेस्ट सामना अनिर्णित झाल्यानंतर विराट कोहलीचे मोठे विधान, म्हणाला- ‘हे लज्जास्पद आहे’
भारतीय संघासाठी ही दुखत बातमी ठरली कारण मालिकेतील सलामीच्या सामन्यात विराटसेना विजयापासून काही पावले दूर होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने असेही म्हटले की, आम्ही पाचवा दिवस पूर्ण करू शकलो नाही आणि ते लज्जास्पद आहे.
IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंड (England) विरुद्ध पहिला कसोटी सामना पाचव्या दिवशी पावसामुळे पूर्ण झाला नाही आणि अनिर्णित घोषित करण्यात आला. भारतीय संघासाठी (Indian Team) ही दुखत बातमी ठरली कारण मालिकेतील सलामीच्या सामन्यात विराटसेना विजयापासून काही पावले दूर होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) असेही म्हटले की, आम्ही पाचवा दिवस पूर्ण करू शकलो नाही आणि ते लज्जास्पद आहे. नॉटिंगहम (Nottingham) येथे झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर आणि पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचे टीम इंडियाचे (Team India) स्वप्न भंग झाले आहे. सामना ड्रॉ झाल्यानंतर भारतीय कर्णधार विराट म्हणाला की, “आम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची अपेक्षा होती, पण पाचव्या दिवशी तो आला. खेळणे आणि पाहणे छान झाले असते, पण लाज वाटते.” (ICC WTC 2021-23 Points Table: नॉटिंगहम टेस्ट ड्रॉ झाल्यावर जो रूट संघाची ‘बल्ले-बल्ले’, टीम इंडियाला मिळाले इतके गुण)
कोहली पुढे म्हणाला की, “आम्हाला दमदार सुरुवात करायची होती आणि आम्हाला असे वाटले की आम्ही पाचव्या दिवशी सामन्यात वरचढ आहोत. ती आघाडी मिळवणे महत्त्वाचे होते, पण पाचव्या दिवशी आम्ही पूर्ण करू शकलो नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. काल रात्री पन्नाशी गाठणे महत्वाचे होते. आम्हाला फक्त अस्तित्वाठी खेळायचे नव्हते. आमच्या हेतूने आम्हाला पुढे ठेवले.” भारताला शेवटच्या दिवशी 157 धावा करणे आवश्यक होते पण पावसाने एकही चेंडू टाकू दिला नाही. कोहली पुढे म्हणाला, “बहुधा हा या मालिकेतील आमचा नमुना असेल, पण अनुकूलता हीच आमची ताकद आहे. विकेटवरील परिस्थिती आणि वेग पाहणे आवश्यक आहे, पण हा संघ आमचा साचा असेल. इंग्लंड आणि भारत नेहमीच एक ब्लॉकबस्टर सामना ठरला आहे आणि पुढील कसोटीची वाट पाहत आहेत.”
दरम्यान, नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन नियमांनुसार भारत आणि इंग्लंड संघाने प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत. खराब हवामानामुळे जास्तीत जास्त 450 पैकी फक्त 250 पेक्षा अधिक ओव्हरचा खेळ शक्य झाला. 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताने चौथ्या दिवसअखेर 14 षटकांत एक बाद 52 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी सततच्या पावसाने समीकरण बिघडवले आणि खेळ सुरूही होऊ शकला नाही. अनेक वेळच्या प्रतीक्षेनंतर पावसाची संततधार सुरु राहिली आणि शेवटी सामना अनिर्णित घोषित करण्यात आला, ज्यामुळे दिवसाचा खेळ रद्द झाला.