IND vs ENG 1st Test 2021: रिषभ पंतची टेस्टमध्ये T20 स्टाईल बॅटिंग, चेन्नई सामन्यात खेचले 4 तुफानी सिक्स, पहा व्हिडिओ
रिषभ पंतने 32व्या षटकात जॅक लीचला मिडविकेटवर सलग दोन षटकार ठोकले आणि टीम इंडियावरील दबाव कमी केला. पंत इथेच थांबला नाही आणि 24व्या व 34व्या ओव्हरमध्ये लीचच्या चेंडूवर आणखी एक-एक षटकार मारला. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या चेन्नई टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतने क्रिकेटचा आक्रमक ब्रँड प्रदर्शित केला.
IND vs ENG 1st Test 2021: एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडने (England) यजमान भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी रविवारी पहिल्या डावात इंग्लंडने विशाल 578 धावांची नोंद केली. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले. यानंतर युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) मैदानावर आला आणि टेस्ट सामन्यात टी-20 शैलीत फलंदाजी सुरुवात केली. डावातील 30व्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर त्याने सलग दोन चौकार खेचत आपले हात उघडले आणि 32व्या षटकात जॅक लीचला (Jack Leech) मिडविकेटवर सलग दोन षटकार ठोकले आणि टीम इंडियावरील दबाव कमी केला. पंत इथेच थांबला नाही आणि 24व्या व 34व्या ओव्हरमध्ये लीचच्या चेंडूवर आणखी एक-एक षटकार मारला. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या चेन्नई टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंतने क्रिकेटचा आक्रमक ब्रँड प्रदर्शित करत अवघ्या 40 चेंडूत अर्धशतकी धावसंख्या गाठली. (IND vs AUS 1st Test Day 3: Bess-आर्चरपुढे भारताचे टॉप-ऑर्डर हतबल, Rishabh Pant ची 'हिटमॅन' स्टाईल फलंदाजी; Tea पर्यंत टीम इंडियाच्या 4 बाद 154 धावा)
आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंतने जॅक लीचच्या चेंडूवर चार षटकार ठोकले आणि तुफानी अर्धशतक पूर्ण केले. पंतने लीचविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आणि त्याने चौकार खेचत 5वे टेस्ट अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्यावर पंत क्रीजवर आला, पण भारतीय युवा फलंदाज दबावाला तो बळी पडला नाही आणि आपला नैसर्गिक खेळ खेळ खेळला. पहा पंतने मारलेले हे उतुंग षटकार:
दुसरीकडे, पंत आणि पुजाराच्या पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारीने संघाला डाव सावरला. चेतेश्वर पुजारा आणि पंत यांनी केवळ 87 चेंडूंत 81 धावांची शानदार भागीदारी केली आणि टी-ब्रेकवर भारताने 4 बाद 154 धावा केल्या. अशास्थतीत, टीम इंडिया इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 578 धावांच्या प्रत्युत्तरात 424 धावांनी पिछाडीवर आहे. डोम बेस आणि आर्चरने भारताला पहिल्या दोन सत्रात मोठे झटके दिले. रोहितला जोफ्रा आर्चरने यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातावर झेलबाद केले. रोहितनंतर शुभमन गिल दुपारच्या जेवणाच्या अगदी आधी आर्चरचा दुसरा शिकार बनला. आर्चरला गिलला जेम्स अँडरसनच्या हाती शानदार झेलबाद केले. गिलने पाच चौकारांच्या मदतीने 28 चेंडूत 29 धावा केल्या. यानंतर कोहलीने 11 धावा केल्या आणि डोम बासने त्याला बाद केले, तर रहाणेलाही बासने बाद केले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2021 03:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

