IND vs ENG 1st Test 2021: टीम इंडियामध्ये काही तासांपूर्वी निवडलेल्या ‘या’ फिरकीपटूला Chennai टेस्ट सामन्यात मिळाली संधी, Kuldeep Yadav याला पुन्हा डच्चू
चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादवला डच्चू देत काही तासापूर्वी संघात सामील करण्यात आलेल्या फिरकीपटूला खेळाडूला संधी दिली. जखमी पटेलच्या जागी संघात निवड झालेल्या शाहबाज नदीम दुसरा टेस्ट सामना खेळणार असल्याचं कर्णधार विराट कोहलीने घोषित केलं.
IND vs ENG 1st Test 2021: भारत (India)-इंग्लंड (England) यांच्यात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या चार सामन्यांच्या सामन्यांच्या पहिल्या टेस्ट सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टॉस दरम्यान दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली ज्या दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली की भारतीय संघाने कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) डच्चू देत काही तासापूर्वी संघात सामील करण्यात आलेल्या फिरकीपटूला खेळाडूला संधी दिली. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी अष्टपैलू अक्षर पटेलला पर्यायी प्रशिक्षण सत्रादरम्यान दुखापत झाली होती आणि ज्यामुळे त्याला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे, जखमी पटेलच्या जागी शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) आणि राहुल चाहरची संघात निवड करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सामन्याच्या तासभरपूर्वी दिली तर, टॉस दरम्यान शाहबाझ नदीम दुसरा टेस्ट सामना खेळणार असल्याचं कर्णधार विराट कोहलीने घोषित केलं. (IND vs ENG 1st Test 2021: Joe Root याने पूर्ण केले टेस्ट सामन्यांचे शतक, डेब्यू व 50व्या टेस्टनंतर इंग्लंड कर्णधारचा चेन्नई येथे कारनामा, वाचा सविस्तर)
इंग्लंडविरुद्ध फिरकीप्रिय चेन्नईच्या खेळपट्टीवर भारतीय संघात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल असे मानले जात होते पण या सामन्यापूर्वी संघात निवडलेला नदीमची दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी निवड झाली. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करणारा नदीम आज आपला दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान, कुलदीपने आपला अंतिम सामना जानेवारी 2019 रोजी खेळला होता आणि दोन वर्षांनंतर अद्याप त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. चेन्नई येथील पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारताने आर अश्विन, नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकीपटूंना संधी दिली आहे तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहचा वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील आहेत.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे कुलदीपला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही नेण्यात आले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. कांगारू संघाविरुद्ध कसोटी विजयानंतर प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने ड्रेसिंग-रूममध्ये भाषणाने कुलदीपचे मनोबल उंचावले होते आणि परिश्रम करत राहा असे म्हटले होते.