IND vs ENG 1st T20I: टीम इंडियापुढे टी-20 मॅचसाठी संघ निवडीचा पेच, इंग्लंडला लढा देण्यासाठी मैदानात उतरतील खतरनाक 11, पहा संघाचा संभावित प्लेइंग इलेव्हन

इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियापुढे संघात अंतिम-11 ची निवड करण्याचा मोठा पेच आहे कारण जवळपास प्रत्येक जागेसाठी दोन दावेदार आहेत. भारतीय संघाच्या संघात सध्या 19 खेळाडू आहेत, त्यापैकी 16 जण खेळण्यासाठी तयार आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st T20I Likely Playing XI: कसोटी मालिकेत दणदणीत विजयानंतर भारतीय संघ (Indian Team) शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरेल. भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाकडे (Team Indian) आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेदरम्यान आपले परफेक्ट संयोजन करण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडिया विजयाची प्रमुख दावेदार म्हणून सुरुवात करेल, कारण त्यांची विजयी घोडदौड सुरूच आहे. यजमान संघाने यापूर्वी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. दुसरीकडे, इंग्लंड संघ इयन मॉर्गनच्या नेतृत्वात विजयपथावर परतण्याच्या निर्धारित असेल. मात्र, इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियापुढे संघात अंतिम-11 ची निवड करण्याचा मोठा पेच आहे कारण जवळपास प्रत्येक जागेसाठी दोन दावेदार आहेत. भारतीय संघाच्या संघात सध्या 19 खेळाडू आहेत, त्यापैकी 16 जण खेळण्यासाठी तयार आहेत. एकूणच पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाला 16 पैकी प्लेइंग इलेव्हन निवडण्याची डोकेदुखी आहे. (IND vs ENG T20I Series 2021: टी-20 मालिकेत मॅच-विनर बनणार ‘हा’ भारतीय, संघात स्थान मिळण्यावर VVS Laxman यांनी केली भविष्यवाणी)

सलामी जोडी: रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल पहिला दोन जगासाठी हस्तगत करण्याचे दावेदार असल्याने संलमी जोडीच्या विचाराने टीम इंडियाची कोंडी सुरू होते. राहुल टी-20 रँकिंगमध्ये दुसरा क्रमांकाचा फलंदाज आहे आणि त्याने बॅटने अलीकडेच चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला बेंचवर बसवण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, भारताचा उपकर्णधार रोहितने कसोटी मालिकेत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि टी-20 मधील त्याचा फॉर्म पाहता तो राहुलसह अव्वल स्थानावर उतरेल. म्हणूनच, आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी धवनला सलामीच्या सामन्यातून बाहेर बसावे लागेल.

मध्य-क्रम: कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येईल याची खात्री आहे, परंतु इतर ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुर्यकुमार यादवने गेल्या काही वर्षांत घरगुती सर्किट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी, टीम इंडियाचा नियमित, श्रेयस अय्यर याला मुंबई इंडियन्सच्या डॅशरपेक्षा पुढे स्थान देण्यात येईल. पाचव्या क्रमांकाची लढत ईशान किशन आणि रिषभ पंत यांच्यात आहे. यादव यांच्याप्रमाणेच किशनचा फॉर्मही घरगुती सर्किटमध्ये खळबळजनक राहिला आहे परंतु पंतचा अलीकडचा फॉर्म पाहता त्याला बाहेर बसवणे योग्य ठरणार नाही. उल्लेखनीय म्हणजे, राहुल अलीकडे वनडे आणि टी-20 सामन्यात विकेटकिपिंग करायचा, पण इलेव्हनमध्ये परतल्यावर पंत विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित आहे.

अष्टपैलू: सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्याचा समावेश केल्याने भारताला भरपूर पर्याय उपलब्ध होतात. शिवाय तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला त्यामुळे तो सामन्यात गोलंदाजी करतो की नाही हे पाहणे उत्साहाचे ठरेल. एकतर वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल अन्य अष्टपैलू खेळाडूंची जागा काबीज करेल. यापूर्वी, सुंदर टी-20 मध्ये किफायतशीर ठरला होता आणि कसोटी मालिकेत बॅटसह चमकला होता. दुसरीकडे, पटेल त्याच्या घरातील स्टेडियमवर खेळत असून डाव्या हाताचा फिरकी पाहुण्यांना त्रास देऊ शकतो.

गोलंदाज: सुंदर किंवा अक्षर सातवे स्थान मिळवण्यास असल्याने टीम इंडियाला कदाचित आणखी एक फिरकीपटू हवा असेल आणि तो निश्चितपणे युजवेंद्र चहल असेल. डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियामध्ये दणदणीत पदार्पण केले असून त्याच्या जागेबाबत कोणत्याही चर्चेची गरज नाही. नवदीप सैनी आणि भुवनेश्वर कुमार हे उर्वरित दोन स्थानांवर कब्जा करतील.

पहा टीम इंडियाचा संभावित प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वाशिंगटन सुंदर/अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.