IPL Auction 2025 Live

IND vs ENG 1st ODI 2021: धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड, Krunal Pandya याचा विश्वविक्रम, पुण्यात टीम इंडियाने पडला विक्रमांचा पाऊस

टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 318 धावांच्या विशाल लक्ष्याच्या प्रत्युत्तरात संघ 251 धावाच करू शकला. आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी विक्रमांची पासून पडला ज्याच्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.

भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st ODI 2021 Stats: पुणे (Pune) येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 318 धावांच्या विशाल लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघ 251 धावाच करू शकला. जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) सलामी जोडीदार जेसन रॉयसह (Jason Roy) शतकी भागीदारी करत संघाला शानदार सुरुवात करून दिली, पण खालच्या फळीतील फलंदाजांची साथ न मिळाल्याने संघ लक्ष्य गाठू शकली नाही,  मोठा पराभवाला सामोरे जावे लागले. बेअरस्टोने 94 धावा केल्या तर रॉयने 46 धावा केल्या. यापूर्वी, भारताकडून शिखर धवन 98 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने 56 धावा करत धवनला साथ दिली तर अखेरच्या क्षणी केएल राहुलच्या नाबाद 62 आणि कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) 58 नाबाद खेळीने संघाला तीनशे पार मजल मारून दिली. आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी विक्रमांची पासून पडला ज्याच्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 1st ODI 2021: टीम इंडियाचा वेगवान मारा, रोमांचक सामन्यात इंग्लंडचा 66 धावांनी दणदणीत पराभव, भारताची मालिकेत 1-0 ने सरशी)

1. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पहिल्या वनडे सामन्यात 60 चेंडूवर 6 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या आणि या खेळीच्या जोरावर त्याने इतिहास रचला. कोहली सर्वात कमी डावात घरच्या मैदानावर 10 हजार धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.

2. इंग्लंडविरुद्ध कारकीर्दीत कोहलीने 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही27वी वेळ ठरली. या प्रकरणात, त्याने राहुल द्रविडला मागे टाकले, ज्यांनी 26 वेळा हा पराक्रम केला आहे. 3. इंग्लंडविरुद्ध 56 धावा करून घरच्या मैदानावर 10,000 धावा करणारा विराट दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

3. विराट कोहलीनेही आपल्या कर्णधार म्हणून वनडे क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. माजी कर्णधार एमएस धोनीनंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

4. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करताना क्रुणाल पांड्याने 31 चेंडूत नाबाद 58 धावा करत दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने फक्त 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले जे डेब्यू सामन्यात भारतीय फलंदाजीने केलेले सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.

5. शिखर धवन इंग्लंडविरुद्ध 98 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आणि पाचव्यांदा नर्व्हस नाईंटीचा शिकार बनला. एकूणच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्यांदा नव्वदीत बाद झाला आहे आणि वनडेमध्ये सर्वाधिक वेळा नव्वदीत आऊट होणार तिसरा फलंदाज ठरला.

6. रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन शानदार अर्धशतक ठोकले आणि सचिन-सेहवागचा मोठा विक्रम मोडला. सलामी जोडीने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतकी भागीदारीच्या रेकॉर्ड-बुकमध्ये सचिन आणि सेहवागच्या जोडीने 30 वेळा ही कामगिरी बजावली, तर धवन आणि रोहित यांच्यातील ही 31वी अर्धशतकी भागीदारी होती. रोहित-धवन जोडीने एकत्र 4911 धावांची भागीदारी केली.

7. जॉनी बेअरस्टो आणि सलामी जोडीदार जेसन रॉय यांनीही इंग्लंडच्या सर्वाधिक शतकी भागीदारीच्या विक्रमाची बरोबरी केली. 12 व्या वेळी रॉय आणि बियरस्टो यांच्यात 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली आहे. इयन मॉर्गन आणि जो रूट यांनी देखील 12 वेळा शतकी भागीदारी केली आहे.

8. जॉनी बेअरस्टोने 40 चौकार खेचत वनडे कारकिर्दीतील 14वे अर्धशतक ठोकले.

यांनतर, दोन्ही संघ शुक्रवार, 26 मार्च रोजी, पुन्हा एकदा मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आमने-सामने येतील. या सामन्यात टीम इंडियाला मालिका खिशात घालण्याची सुवर्ण संधी असेल तर इंग्लंड मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.