IND vs ENG 1st ODI 2021: टीम इंडियाचा वेगवान मारा, रोमांचक सामन्यात इंग्लंडचा 66 धावांनी दणदणीत पराभव, भारताची मालिकेत 1-0 ने सरशी
टीम इंडियाने दिलेल्या 318 धावांच्या विशाल लक्ष्याच्या प्रत्युत्तरात संघ 251 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND vs ENG 1st ODI 2021: पुण्याच्या (Pune) गहुंजे स्टेडियमवर खेळण्यात आले पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या (Indian Team) भेदक माऱ्यापुढे इंग्लंड (England) संघाने गुडघे टेकले ज्यामुळे संघाला धावांनी 66 पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 318 धावांच्या विशाल लक्ष्याच्या प्रत्युत्तरात संघ 251 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक 94 धावांची खेळी केली तर जेसन रॉयने (Jason Roy) 46 धावा, मोईन अलीने 30 आणि कर्णधार इयन मॉर्गनने 22 धावांचे योगदान दिले. शिवाय, तिसऱ्या स्थानावर बढती मिळालेला बेन स्टोक्स पराभव पाडण्यात अपयशी ठरला आणि एक धावच करू शकला. दुसरीकडे, भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाजांनी पुढाकार घेत इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले. प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) 4, शार्दूल ठाकूरने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 आणि कृणाल पांड्याला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 1st ODI 2021: पदार्पण सामन्यात विश्वविक्रमी खेळी करणाऱ्या Krunal Pandya याला कॅमेरासमोर अश्रू अनावर, भाऊ हार्दिकने असा दिला आधार)
भारतीय संघाने पहिले फलंदाजी करून दिलेल्या तीनशे पार धावसंख्येचा लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश टीमसाठी बेअरस्टो आणि रॉयच्या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान बेअरस्टोने अवघ्या 40 चेंडूत अर्धशतकी टप्पा गाठला. यांनतर, संघाच्या विकेट पाडण्याचे सत्र सुरु झाले आणि कृष्णाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेत इंग्लंडला पहिला दणका दिला. प्रसिद्धने जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं. यानंतर,प्रसिद्धने आक्रमक स्टोक्सला शुबमन गिलच्या हाती 1 धावेवर कॅच आऊट केलं. शार्दुल ठाकूरने बेयरस्टोला 94 धावांवर कुलदीप यादवच्या हाती कॅच आऊट करत संघाला तिसरे यश मिळवून दिले. ठाकूरने इंग्लंडला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के देत संघाच्या अडचणीत वाढ केली. शार्दुलने पहिले मॉर्गन आणि त्यानंतर जोस बटलरला आऊट केलं. कृणालने सॅम करनला शुबमन गिलच्या हाती 12 धावांवर आऊट केलं आणि वनडे करिअरची पहिली विकेट काढली.
यापूर्वी, भारताकडून शिखर धवन 98 धावांची दमदार खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने 56 धावा करत धवनला साथ दिली तर अखेरच्या क्षणी केएल राहुलच्या नाबाद 62 आणि कृणाल पांड्याच्या 58 नाबाद खेळीने संघाला तीनशे पार मजल मारून दिली.