IPL Auction 2025 Live

IND vs ENG 1st ODI 2021: पदार्पण सामन्यात विश्वविक्रमी खेळी करणाऱ्या Krunal Pandya याला कॅमेरासमोर अश्रू अनावर, भाऊ हार्दिकने असा दिला आधार (Watch Video)

मंगळवारी इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (एमआय) सुपरस्टार फलंदाजाने आपले अर्धशतक वडील वडील हिमांशु पांड्या यांना अर्पण केले. या सामन्यात त्याने फलंदाजी करताना विक्रमी अर्धशतकी खेळी केली, मात्र डाव संपल्यानंतर मुलाखती दरम्यान कॅमेरा समोरच ढसाढसा रडू लागला.

भावनिक कृणालला हार्दिकचा आधार (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st ODI 2021: क्रुणाल पांड्यासाठी (Krunal Pandya) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण भावनिक ठरले. मंगळवारी इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या वनडे सामन्यात मुंबई इंडियन्सच्या (एमआय) सुपरस्टार फलंदाजाने आपले अर्धशतक वडील हिमांशु पांड्या (Himanshu Pandya) यांना अर्पण केले. या सामन्यात त्याने फलंदाजी करताना विक्रमी अर्धशतकी खेळी केली, मात्र डाव संपल्यानंतर मुलाखती दरम्यान कॅमेरा समोरच ढसाढसा रडू लागला. यापूर्वी लहान भाऊ हार्दिक (Hardik Pandya) याच्याकडून डेब्यू कॅप घेताना देखील तो भावनिकही झाला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करतत भारताने 317 अशा विशाल धावसंख्येपर्यंत मजल मारली ज्यात क्रुणालचा आतिशी अर्धशतकांचा डाव महत्त्वपूर्ण ठरला. त्याने केएल राहुलसह नाबाद 112 धावांची भागीदारी केली. राहुल 43 चेंडूत 62 तर क्रुणाल 31 चेंडूत 58 धावा करून नाबाद परतले. (IND vs ENG 1st ODI 2021: Virat Kohli याचा विक्रमांचा वर्षाव, सचिन तेंडूलकर याच्यानंतर सर्वाधिक वेगाने ठोकल्या 10 हजार धावा)

पहिल्या सामन्यात केवळ 26 चेंडूत अर्धशतक झळकावून विश्वविक्रम करणारा क्रुणालला मैदानावर कॅमेरापुढे मुलाखती दरम्यान वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. डेब्यू वन डेमध्ये या फलंदाजाने वेगवान अर्धशतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि डाव संपल्यानंतर जेव्हा तो कॅमेर्‍यासमोर आला तेव्हा त्याच्या तोंडून काहीच शब्द बाहेर पडले नाही तो ढसढसा रडू लागला. अखेर त्याला धाकटा भाऊ हार्दिकने त्याला मिठी मारत आधार दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यापूर्वी, कृणालने पहिल्या वनडेत अर्धशतक करताच बॅट आकाशाकडे उंचावत हे अर्धशतक आपल्या दिवंगत वडीलांना अर्पण केले. पदार्पण सामन्यात पहिले एकदिवसीय अर्धशतक झळकावल्यानंतर क्रुणालला माजी भारतीय फिरकीपटू आणि पूर्णवेळ पंडित मुरली कार्तिकने मुलाखतीसाठी बोलावले. “हे माझ्या वडिलांसाठी आहे. मी भावनिक झालो,” मुलाखतीच्या वेळी भारतीय अष्टपैलू खेळाडू भावूक होत म्हणाला.

भावनिक कृणाल

कृणालला हार्दिकचा आधार

दरम्यान, आजच्या सामन्यात इंग्लिश संघाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. अशास्थितीत, फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना 317 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 98 धावा केल्या. शिवाय विराट कोहली 56 धावा, केएल राहुल नाबाद 62 व कृणाल नाबाद 58 अशी अर्धशतके ठोकली. इंग्लंडसाठी अष्टपैलू बेन स्टोक्स 3 तर, मार्क वूडला 2 विकेट मिळाल्या.