IND vs BAN: बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा; रिषभ पंत सह 'या' खेळाडूंच्या समावेश अद्याप गुलदस्त्यात
आणि यासाठी भारतीय संघाची आज, 24 ऑक्टोबरला घोषणा होणार आहे. नुकताच विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळकडून दुहेरी शतक झळकावणा सॅमसनची पंतनंतर दुसरा पर्याय म्हणून निवड होण्याची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी-20 आणि टेस्ट प्रभावी कामगिरीनंतर भारतीय संघ आता बांग्लादेशविरुद्ध मालिकेसाठ सज्ज होत आहे. भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ 3 नोव्हेंबरपासून बांग्लादेश संघाविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आणि 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. आणि यासाठी भारतीय संघाची आज, 24 ऑक्टोबरला घोषणा होणार आहे. बीसीसीआय निवड समिती जेव्हा संघ निवडण्याच्या प्रक्रियेसाठी एकत्र येईल तेव्हा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा वर्कलोडचा मुद्दा चर्चेत घेतला जाईल, तर रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यासह संजू सॅमसन (Sanju Samson) याचाही संघात समावेश केला जाईल. ऑक्टोबर 2018 पासून भारताने सर्व फॉरमॅटमध्ये 56 सामने खेळले आहेत, त्यापैकी कोहलीने 48 सामने खेळला आहे. पण, विश्रांती घ्यायची आहे की नाही हे निवड समितीने कोहलीवरच सोपवले आहे. (IND vs BAN T20I 2019: टी-20 मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, बंदी घातलेल्या 'या' खेळाडूचे 3 वर्षानंतर संघात पुनरागमन)
पंत आणिसॅमसनशिवाय युवा खेळाडू शिवम दुबे याच्याही समावेशावर चर्चा केली जाऊ शकते. दुबेला दुखापतीने ग्रस्त अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या जागी संघात स्थान मिळू शकते. 3 नोव्हेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेव्यतिरिक्त, बांग्लादेश वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतर्गत दोन कसोटी सामने (इंदूर आणि कोलकाता) खेळणार आहेत. जर कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला, तर सॅमसनकडे म्हणून पाहिले जात आहे. पण, सर्वात महत्वाचे म्हणजे, मनीष पांडे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळलेल्या संघात आपली जागा टिकवून ठेवायला यशस्वी होतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.
नुकताच विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळकडून दुहेरी शतक झळकावणा सॅमसनची पंतनंतर दुसरा पर्याय म्हणून निवड होण्याची अपेक्षा आहे. राहुल चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना आणखी एक संधी मिळणार असल्याने फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची निवड होणे अपेक्षित नाही. शिवाय, विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या के एल राहुल याचे संघात पुनरागमन होणे निश्चित मानले जात आहे.